दिल्ली : कोरोनापासून बचाव म्हणून लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. यानंतर बूस्टर डोस देण्याचीही घोषणा करण्यात आली. मात्र बूस्टर डोस संदर्भात अनेक शंका लोकांच्या मनात होत्या. मात्र आता या शंका केंद्र सरकारने दूर केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी शुक्रवारी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.


कोविडमधून बरं झाल्यानंतर 3 महिन्यांनंतर द्यावा बूस्टर डोस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकास शील यांनी पत्रात लिहिलं की, "आम्हाला अनेक ठिकाणांहून प्रिकॉशनरी डोसच्या वापराबाबत प्रश्न विचारले जात होते. सर्वांनी हे लक्षात घ्यावं की, ज्या व्यक्तीची लॅबमध्ये कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आढळून आली आहे, त्याला या आजारातून बरे झाल्यानंतर 3 महिन्यांनंतरच पिकॉशनरी डोस दिला.


विकास शील यांनी असंही पत्रात असंही म्हटलं की, "मी तुम्हाला विनंती करतो की, संबंधित अधिकाऱ्यांना याची दखल घेण्याच्या सूचना दिल्या जाव्यात. केंद्राची ही सूचना National Technical Advisory Group on Immunisationच्या शिफारशीवर आधारित आहेत."


10 जानेवारीपासून प्रिकॉशनरी डोसला सुरुवात


3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीकरण सुरू करण्यात आलं. यासोबतच 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील वृद्धांनाही प्रॉकॉशनरी डोस द्यायला सुरुवात केली. दुसऱ्या डोसनंतर केवळ नऊ महिन्यांनी सावधगिरीचा डोस दिला जाईल.