World Cerebral Palsy Day 2023 : सेरेब्रल पाल्सी हा मेंदुशी संबंधित विकार आहे. सेरेब्रल पाल्सी या विकारामुळे स्नायूंच्या हालचालीवर मर्यादा येतात. मेंदुला आघात झाल्यामुळे आकलनक्षमता, शिकणे, बुद्धी, स्वभाव, वाचा, हात, पायांच्या हालचाली यांसह अन्य बाबींवर परिणाम होतो. इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ सेरेब्रल पाल्सी’ या संघटनेतर्फे 2010 या वर्षापासून दि. 6 ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय सेरेब्रल पाल्सी दिन’ म्हणून साजरा केला जातो. संघटनेतर्फे दरवर्षी एक संकल्पना घेऊन त्याविषयी जनजागृती केली जाते. सेरेब्रल पाल्सी हे भारतातल्या लहान मुलांमध्ये अपंगत्व येण्याचे मुख्य कारण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेरेब्रल पाल्सी होण्याच्या मागे अनेक बाबी कारणीभूत आहेत. सेरेब्रल पाल्सी होण्याची काही कारणे अशी आहेत प्रसुती दरम्यान आईला झालेला संसर्ग, काही औषधांचे सेवन, गंभीर जखमा ही प्राथमिक कारणे असू शकतात. प्राणवायूची कमतरता, कावीळ, सीझर किंवा मेंदूत पाणी जमा होणे यामुळेही सेरेब्रल पाल्सी होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी जन्माला येणाऱ्या एक बालकांमधील तीन ते पाच जणांना सेरेब्रल पाल्सी हा रोग होतो.


मुंबईतील रीजनरेटिव्ह मेडिसिनचे डॉ. प्रदीप महाजन सांगतात की, 'सेरेब्रल पाल्सी असणारे मूल स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तसेच त्यांच्या हाताच्या तसेच पायांच्या स्नायूंमध्ये ताठरता वाढते. जरी हा प्राथमिकदृष्ट्या हालचालींवर मर्यादा आणणारा विकार असला तरी मेंदूतील ज्या भागावर हा परिणाम घडवतो, त्यानुसार रुग्णाच्या आकलनक्षमता, शिकणे, बुद्धी, स्वभाव, संवाद, वाचा, संवेदना, श्रवण तसेच दृष्टीवर परिणाम घडवतो. स्टेमसेल्स थेरपी सारख्या उपचार पध्दतीमुळे अशा गंभीर आजाराशी लढण्यास फायदेशीर ठरते. या मुलांमध्ये आनंद, उत्साह, आत्मविश्वास भरण्याची गरज आहे. दैनंदिन जीवनात व्यायाम, पोषक आहाराचा समावेश करणेही तितकेच गरजेचे आहे.'


जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त, जगभरातील लोक विविध मार्गांनी जनजागृतीसाठी करतात. हिरवा रंगाचे कपडे परिधान करणे: हिरवा रंग हा सीपी जागरूकतेचा अधिकृत रंग आहे. अनेक व्यक्ती आणि संस्था या दिवशी हिरवे कपडे किंवा त्या रंगाच्या वस्तू परिधान करुन आपला पाठिंबा दर्शवतात.


निधी उभारणी


संशोधन आणि उपचाराकरिता असंख्य धर्मादाय संस्था आणि सामाजित संस्था देणग्या आणि निधी गोळा करतात.


सोशल मीडिया मोहिमा


सोशल मीडिया जागरूकता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.#WorldCPDay हा हॅशटॅग कथा, तथ्ये आणि समर्थनाचे संदेश पोहोचविण्याकरिता वापरला जातो.


शैक्षणिक उपक्रम


शाळा आणि शैक्षणिक संस्था अनेकदा या स्थितीबद्दल विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी विविध उपक्रम आणि कार्यशाळा राबवितात


सामुदायिक उपक्रम


स्थानिक समुदाय समज आणि समावेश वाढवण्यासाठी कार्यक्रम, कार्यशाळा आणि चर्चा आयोजित करू शकतात.


रिजनरेटिव्ह औषधाची भूमिका


पुनरुत्पादक औषध सेरेब्रल पाल्सी (CP) सारख्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरवर उपचार करण्यासाठी आशादायक उपचार प्रदान करते, जो बर्याचदा जन्माच्या वेळी मेंदूसंबंधीत होणाऱ्या आघातामुळे. सेल बेस थेरपी, रिजनरेटिव्ह औषधाचा एक महत्त्वाचा घटक, नुकसान झालेल्या मेंदूच्या ऊतींची दुरुस्ती करण्याची आणि रुग्णांमध्ये मोटर स्किल्स सुधारण्याची क्षमता ठेवते. या उपचारांचा उद्देश शरीराच्या नैसर्गिक पुनरुत्पादक प्रक्रियांना उत्तेजन देणे, न्यूरल कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि अपंगत्व कमी करणे हा आहे.