बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. अशा वातावरणात अनेक आजार डोकंवर काढतात. बदलत्या वातावरणामुळे लोकांना डेंग्यू, मलेरिया अशा आजारांचा सामना करावा लागतो. पावसाच्या दिवसात साठलेल्या पाण्यावर डासांची संख्या वाढते. डास चावल्यामुळे मलेरिया आजार होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. म्हणून मलेरियापासून बचाव करण्यासाठी खास टिप्स...   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- आपण सर्वच जाणतो की मलेरिया हा संक्रमित 'एनोफेलेस' डास चावल्याने होतो. त्यामुळे डासांपासून सुरक्षा देणारे क्रिम किंवा स्प्रेचा वापर करावा. 


- कुंड्या, बादली, टाकी यात पाणी अधिक काळ साठवून ठेवू नका. घरच्या आजुबाजुला खोल ठिकाणी पाणी जमा होऊ देऊ नका.


- खूप डास असलेल्या ठिकाणी नेहमी फुल कपडे घाला.


- मलेरियापासून बचावासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. त्यासाठी आयर्न आणि इतर पोषक घटकांचा आहारात समावेश करा. जंकफूड, तळलेले पदार्थ खाणे टाळा.


- मच्छरदाणीचा वापर करा. त्याप्रमाणे संध्याकाळच्या वेळेस दरवाजे, खिडक्या बंद ठेवा.


- वेळेतच डॉक्टरांचा सल्ला घ्या.