Measuring Blood Pressure: आजकालच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार जडण्याची शक्यता असते. यावेळी उच्च रक्तदाबाची समस्या देखील अनेक जणांना आढळते. आजकाल ब्लड प्रेशर घरच्या घरी मोजणंही शक्य झालंय. मात्र घरी मशिन आणून रक्तदाब तपासल्याने अचूक प्रमाण मिळू शकतं का? तसंच घरी रक्तदाब तपासताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे पाहूयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचं हृदय ज्या क्षमतेने संपूर्ण शरीरापर्यंत रक्त पोहोचवण्याचे काम करते त्यालाच रक्तदाब असं म्हणतात. पूर्वी डॉक्टरांकडे जाऊन रक्तदाब पातळी मोजली  तरच ते "अचूक" आहे असं मानलं जात होतं. मात्र, आता रक्तदाबाच्या रुग्णांना घरच्या घरी देखील नियमितपणे बीपी मोजणं शक्य झाले आहे. अचूक रक्तदाब पातळी कशी मोजावी यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे याची माहिती मुंबईतील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. कौशल छत्रपती यांनी दिली आहे.


 रक्तदाब मोजण्याच्या अटी कोणत्या 


रक्तदाब मोजण्यापूर्वी 30 मिनिटे आधी आहार, द्रव पदार्थांचे सेवन, धूम्रपान करणे किंवा व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच यावेळी मूत्राशय रिकामे असावे.


बसण्याची योग्य पद्धत


पाठीला योग्य आधार देत पाय जमिनीवर ठेवून बसा. पाय एकमेकांवर न ठेवता सरळ ठेवा. हात हृदयाच्या पातळीवर समांतर असावा, टेबलासारख्या मजबूत सपाट पृष्ठभागाचा आधार घ्यावा.


पट्टा योग्य बांधणे आवश्यक


लक्षात ठेवा हाताला या मशीनबरोबर आलेला पट्टा लावत असताना अधिक घट्ट आणि सैल लावू नका. यामुळे रक्तदाबाच्यारिडिंगवर परिणाम दिसू शकतो. पट्टा आणि त्वचेमध्ये कपडे नसावेत.


कधी घ्यावं रिडींग


दररोज एकाच वेळी बीपी रीडिंगघ्या. जसे की सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ.


नोंद करा


प्रत्येक वेळी रिडींग घ्या आणि त्यांची नोंद करा. मग जेव्हा तुम्ही डॉक्टरांना भेटण्यास जाल तेव्हा ते घेऊन जा.


रक्तदाब जास्त असल्यास...


रक्तदाब180/120 पेक्षा जास्त असल्यास, 5 मिनिटांनंतर तो पुन्हा मोजा. रिडींग सतत वाढत असल्यास, जवळच्या रूग्णालयातीलआपत्कालीन सेवेला कॉल करा आणि स्वतःची तपासणी करुन घ्या. तसंच उपकरण आणि रुग्णासंबंधीत विशिष्ट घटकांची काळजी घ्यायला विसरु नका.


गरोदर स्त्रिया किंवा मुलांसाठी बीपीची उपकरणे निवडताना त प्रमाणित बीपी उपकरणांची निवड करा. आपल्या हाताचा आकार पाहता त्या नुसार पट्ट्याचा आकार निवडा. बारीक, मध्यम आणि लठ्ठ लोकांना वेगवेगळ्या आकाराच्या पट्टे वापरावे लागतात.