नवी दिल्ली : देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. गेल्या चार महिन्यांपासून भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. या धोकादायक विषाणूच प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता फैलाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन घोषित केला. याचा फटका छोट्या उद्योगांपासून बड्या कंपन्यांना देखील बसला, पण प्रमुख्याने लॉकडाऊनचा मोठा परिणाम मुलांच्या शिक्षणावर झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या डिजिटलमाध्यमांद्वार विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर भर दिला जात आहे. पण हा ऑनलाईन अभ्यास मुलांच्या आरोग्यास कितपत योग्य आहे असा प्रश्न देखील याठिकाणी उपस्थित होत आहे. ऑनलाईन अभ्यासामुळे मुलांमा उद्भवणाऱ्या मानसिक समस्या, चिडचिडेपणा, डोळ्यांवर पडणारा ताण इत्यांदी गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. 


ऑनलाईन अभ्यास करताना मुलांची आसन व्यवस्था सर्वात महत्त्वाचा भाग आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना पाठीचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  ऑनलाईन  क्लासेस दरम्यान अँटी ग्लेअर ग्लासचा वापर करा त्यामुळे डोळ्यांना जास्त त्रास होणार नाही. 


शिवाय डॉक्टरांचा सल्ला घेवून आय ड्रॉपचा वापर करावा. त्याचप्रमाणे ऑडिओसाठी दर्जेदार हेडफोन्सचा वापर करावा. आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी नियमित प्राणायाम करणं देखील तितकचं गरजेचं आहे.