मुंबई : शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं ज्यामुळे रक्ताभिसरणात अडथळा येतो आणि हृदयावर दबाव येतो. मात्र अशा काही भाज्या आहेत ज्या कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून रोखतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भाज्यांबद्दल (Cholesterol Lowering Veggies) सांगणार आहोत, ज्या खाल्ल्याने तुमच्या शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल (Bad cholesterol) वाढणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा धोका तर वाढतोच पण स्ट्रोक, ब्रेन हॅमरेज आणि अर्धांगवायूचा धोकाही वाढतो. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल वाढण्याचं कारण म्हणजे धूम्रपान, खराब आहार, व्यायाम न करणे, जास्त तेलकट अन्न खाणे. पण जर तुम्ही रोज तुमच्या आहारात योग्य भाज्या समाविष्ट करायला सुरुवात केली तर त्याचे दोन फायदे होतील. तर जाणून घ्या कोलेस्ट्रॉलमध्ये कोणत्या भाज्या खाव्यात.


भेंडी


भेंडीमध्ये असलेले पॉलीफेनॉल नैसर्गिकरित्या जळजळ कमी करतात आणि रक्तामध्ये चरबी जमा होऊ देत नाही. अनेक संशोधनांमध्ये हे देखील सिद्ध झालं आहे की, जे लोक रोज किमान 300 ग्रॅम भिंडी खातात, त्यांच्या खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊ लागतं.


लसूण


लसूण उच्च कोलेस्टेरॉलवर औषधासारखी काम करते. लसूण रोज सकाळी रिकाम्या पोटी खाण्याची सवय लावा. पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासोबतच रक्तातील वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करण्यासही मदत करतं.


वांग


वांगी पाहून अनेकजण तोंड मुरडतता पण या वांग्यामध्ये खूप गुण आहेत. यामध्ये लोह, झिंक, फॉस्फरस, पोटॅशियम हे घटक असतात. ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यासोबतच शरीरातील चरबी कमी होते. प्लाक जमा होण्यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही या वांग्याचा तुमच्या आहार चार्टमध्ये समावेश करणं आवश्यक आहे.