Garlic for Cholesterol : बदलेल्या जीवनशैलीमुळे आजकाल कोलेस्ट्रॉलची समस्या प्रत्येकामध्ये थोड्या फार प्रमाणात दिसून येते. आपल्या प्रत्येकाच्या शरीरात चांगल आणि वाईट कोलेस्ट्रॉल असतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे. तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलमुळे एक प्रकारचा चिकट थर जमा होतो. त्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. अशात तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल नियंत्रात राहवं असं तुम्हाला वाटत असेल तर स्वयंपाकघरातील हा एक छोटा पदार्थ तुम्ही दररोज खायला पाहिजे. (Cholesterol Home Remedies Garlic for Cholesterol strong heart health in marathi)


लसूण कोलेस्ट्रॉलचा शत्रू!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसूण अशी गोष्ट आहे जी जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात पदार्थांमध्ये वापरली जाते. लसूण खाल्ल्याने तुमच्या जेवणाची चव तर वाढतेच पण ते तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये ॲलिसिन नावाचं कंपाऊंड आढळतं, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास अतिशय फायदेशीर असतं. 



लसूण खाण्याचे फायदे


1. कोलेस्ट्रॉल कमी करते - लसणाचे नियमित सेवन केल्याने 'LDL' कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते तर 'HDL' कोलेस्ट्रॉल पातळी वाढते.
2. रक्तदाब नियंत्रित करते -  लसणाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
3. रोगप्रतिकारशक्ती वाढवते - लसणात अँटिऑक्सिडेंट असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदतगार सिद्ध होतं आणि संसर्गापासून संरक्षण करतं.
4. रक्त गोठण्यास प्रतिबंध करते - लसणाच्या सेवनाने रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता कमी होते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो, असं तज्ज्ञ सांगतात.


लसणाचे सेवन कसे करावे? 


लसणाचे सेवन करण्याचे अनेक मार्ग असून भारतीय घरांमध्ये चटणी, लोणच या स्वरुपात वापरलं जातं. तुम्ही सूप आणि पावडरच्या रुपातही याच सेवन करु शकता. पण कच्च सणाच्या 1-2 पाकळ्या सकाळी रिकाम्या पोटी खाणे हे सर्वात फायदेशीर मानले जाते. 


ही काळजी घ्या!


लसूण हे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने काही दुष्परिणामही होण्याची भीती असते. पोटात जळजळ, अपचन किंवा ऍलर्जीच्या समस्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे लसणाचे सेवन फक्त संतुलित प्रमाणात करावे. त्याशिवाय कोणत्याही आरोग्याच्या समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. 


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)