Cholesterol Symptoms In Marathi: साधारणपणे 20 वयानंतर लोकांमध्ये कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी वाढण्यास सुरुवात होते. कोलेस्टेरॉल हा कोलेस्टेरॉल वॅक्स (Cholesterol Wax) किंवा मेणासारखा एक पदार्थ आहे. आपल्या शरीरातील स्नायू आणि हार्मोन्सच्या निर्मितीसाठी कोलेस्टेरॉल महत्त्वाचे आहे. त्यासोबतच शरीराच्या योग्य कार्यासाठी शरीरात कोलेस्टेरॉलची खूप गरज असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Increased Problem) वाढल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. जसे की, आर्टरी ब्लॉकेज, स्टोक्स, हार्टअटॅर आणि ह्रदयाचे इतर आजार. जेव्हा आपल्या शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले की, आपलं शरीर काही संकेत देऊ लागते. हे संकेत समजून घेऊन वेळीच ब्लड टेस्ट करावी आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून सुटका मिळवावी. 


गंभीर बाब म्हणजे शरीरात कोलेस्टेरॉलची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढले आहे आणि किती वाढले आहे हे लगेच ओळखता येत नाही. खरं तर, कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे रक्तवाहिनीमध्ये म्हणजेच रक्ताच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होतात, त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह मंदावतो. या शिवाय काही संकेत आहे जे  तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल वाढले आहे. दरम्यान ते संकेत कोणते आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत... 


छातीत दुखणे आणि अस्वस्थ वाटणे: कोलेस्टेरॉल वाढल्याने प्रामुख्याने हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. जर तुम्हाला छातीत दुखत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल किंवा हृदयाची धडधड सर्वसामान्य प्रमाणापेक्षा जास्त असेल, तर कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. त्यावेळी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. 


मुंग्या येणे, खाज सुटणे : कोलेस्टेरॉलमुळे शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो, त्यामुळे जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा ऑक्सिजनयुक्त रक्त शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचत नाही. काही कारणास्तव हात आणि पाय सुन्न होणे आणि मुंग्या येणे. कधी कधी त्याच जागेवर बराच वेळ बसून राहिल्यानंतरही हात-पायांमध्ये मुंग्या येणे जाणवते. परंतु असे होत नसले तरीही, जर तुमच्या आरोग्याच्या समस्या अशाच असतील, तर तुम्ही तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी तपासायला हवी.


धाप लागणे :  उच्च कोलेस्ट्रॉलमुळे जास्त काम न करताही थकवा जाणवतो. विशेषतः जाड लोकांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. यामध्ये श्वास भरुन येणे किंवा थकवा जाणवण्याची अनेक कारणे असू शकतात. पण असे होत असेल तर तुम्ही कोलेस्टेरॉलची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.


डोकेदुखी: जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तरच तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणे दिसू शकतात. कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे डोक्याच्या नसांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे अशा समस्या उद्भवतात.


लठ्ठपणा :  कोणतेही कारण नसतानाही तुमचे वजन वाढू लागले तर समजून जा हे ही उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण आहे. त्याचबरोबर तुम्हाला पोटात जडजड वाटत असेल, नेहमी पेक्षा जास्त घाम येत असेल किंवा अधिक गरम होऊ लागले असे वाटत असेल तर कोलेस्ट्रॉल तपासून घायचा सल्ला डॉक्टर देतात. 


 


 


 


( Disclaimer : वर देण्यात आलेल्या गोष्टी केवळ सामान्य माहिती प्रदान करतात. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. झी 24 तास या गोष्टींची पुष्टी करत नाही. )