Food That Can Increase Cholesterol: सध्या थंडीचे दिवस आहेत. थंडीत वाढ होत आहे. सर्दी, तापाच्या रुग्णांत वाढ होत आहे. (Health News) त्यामुळे हिवाळ्यात ठणठणीत राहण्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्यातच हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढू म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. हिवाळ्यात काही लोकांची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, जे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्याचवेळी, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे, हृदयाशी संबंधित समस्या देखील सुरु होतात. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक हिवाळ्याच्या हंगामात विचार न करता अनेक गोष्टी खातात. त्या त्यांनी टाळल्या पाहिजेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही  पदार्थांच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढते. कोलेस्ट्रॉल वाढल्याने अनेक आजारांचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत आपण अनेक पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे. हिवाळ्यात कोणते पदार्थ खाऊ नयेत, ते जाणून घ्या. हे पदार्थ टाळले तर तुमचा कोलेस्ट्रॉलचा धोकाही कमी होईल.


हिवाळ्यात चुकूनही हे खाऊ नका  


जंक फूड  


आपले आरोग्य हिवाळ्यात चांगले ठेवायचे असेल तर प्रथाम तुम्ही जंक फूड खाणे सोडून द्या. हे जंक फूड शरीरासाठी खूप हानिकारक आहे. याच्या सेवनामुळे लठ्ठपणा वाढण्याबरोबरच कोलेस्ट्रॉलची पातळीही झपाट्याने वाढते. कारण जंक फूड हे मैदा आणि विविध मसाल्यापासून बनवले जाते. दुसरीकडे, जर तुम्ही जंक फूड जास्त खाल्ले तर कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढते आणि हृदयासंबंधिच्या आजारात वाढ होते.


तळलेले पदार्थ तसेच तेलयुक्त अन्न  


 तळलेले अन्न शरीरासाठी मोठे नुकसान पोहोचवते. याचे सेवन केल्याने लठ्ठपणा वाढण्यासोबतच शरीरात अनेक प्रकारचे आजार होण्याची भीती असते. हे पदार्थ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि हृदयाशी संबंधित समस्याही वाढतात. दुसरीकडे, तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनसंस्था बिघडू शकते.


गोड पदार्थ


जास्त गोड पदार्थ तसेच मिठाई खाणे शरीरासाठी हानिकारक आहे. कारण मिठाईमध्ये भरपूर साखर आणि सॅच्युरेटेड फॅट्स आढळतात, जे शरीरासाठी हानिकारक असतात. त्यामुळे मिठाईच्या अतिसेवनामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यासोबतच हृदयाशी संबंधित आजारही होऊ लागतात. त्यामुळे हिवाळ्यात गोड पदार्थ खाण्याचे टाळावे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)