मुंबई : आपल्या शरीरात रक्तातील चरबीचं प्रमाण जेव्हा जास्त होतं तेव्हा शिरा आकुंचन पावू लागतात. शिरा अरुंद झाल्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, परंतु योग्य आहार आणि व्यायामाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा फळाबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही दिवसातून एकदाही खाल्लं तर तुमच्या नसांमध्ये साठलेली चरबी निघून जाण्यास मदत होईल. शिवाय यकृतातील खराब कोलेस्ट्रॉलची निर्मितीही कमी होऊ लागते. हे फळ अॅव्होकॅडो आहे. 


अॅव्होकॅडोमध्ये असलेली चरबी मोनोअनसॅच्युरेटेड फॅटच्या स्वरूपात असते आणि ती चांगल्या कोलेस्ट्रॉलसाठी चांगली असते. तसंच ते खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्याचं काम करतं.


एका अभ्यासामध्ये असं दिसून आलंय की, सहा महिने दररोज अॅव्होकॅडो खाल्ल्याने धोकादायक कोलेस्टेरॉलची पातळी झपाट्याने कमी होते. कोलेस्टेरॉल कमी होण्यास महिनाभरात सुरुवात होते.


पेन स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर पेनी ख्रिस अथर्टन यांचा एक संशोधन रिपोर्ट अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता. ज्यामध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की, अॅव्होकॅडो केवळ रक्तामध्ये साठलेली चरबी काढून टाकतं असं नाही तर ते बेली फॅट किंवा वजन वाढण्यास प्रतिबंध करतं.


संशोधनात असंही सांगण्यात आलं आहे की, रोज एक अॅव्होकॅडो खाल्ल्याने वजन वाढणं देखील थांबते आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल देखील कमी होऊ लागतं.


या संशोधनामध्ये 923 सहभागींना सहा महिने दररोज एक अॅव्होकॅडो खाण्यासाठी देण्यात आला आणि त्यांच्या रक्तदाबावर सतत देखरेख ठेवली गेली. यावेळी चाचणीच्या महिनाभराच्या कालावधीत, सर्वांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी असल्याचं आढळून आलं. अॅव्होकॅडोमध्ये फोलेट, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससह अनेक पोषक घटक असतात.


उच्च कोलेस्ट्रॉल असल्यास काय खाऊ नये 


कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, दुग्धजन्य पदार्थांसह मांस-मासे, पॅकेज पदार्थ, चिप्स, प्रक्रिया केलेले पदार्थ. सोबत दररोज किमान 45 मिनिटे हार्डकोर व्यायाम करा.