मुंबई : रोजच्या कामाचा ताण, नैराश्य, नोकरी, ट्रफिक आणि आपली सतत बदलती जीवनशैली याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यात चेहऱ्याचे सौंदर्य कायम ठेवणं हे एक मोठं आव्हान प्रत्येकासमोर असतं. त्याचप्रमाणे व्यस्त वेळापत्रकामुळे पार्ललमध्ये जाणं देखील होत नाही. त्यासाठी कॉफी एकमात्र उपाय आहे. कॉफीने तुम्ही घरबसल्या फेशिअल करून तुमचा चेहरा आणखी उजळू शकता.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्वचेला अधिक उजाळा देण्यासाठी कॉफी हा पदार्थ अतिशय महत्वाचे काम करतो. त्वचेस तजेलदार करण्यास तसेच चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी देखील हे अतिशय फायदेशीर ठरते.


तजेलदार स्किनसाठी २ चमचा कॉफी पावडर, १ चमचा साखर आणि अर्धा चमचा नारळाचं तेल हे तिन्ही पदार्थ अगोदर एकत्रीत करून त्याचे मिश्रण बनवा. तयार मिश्रणाला चेहऱ्यावर लावून ५ ते १० मिनिटे ठेवा. या मिश्रणाला हलक्या हातांनी स्क्रब करा आणि स्वच्छ पाण्यात चेहरा धुवा.