या एका उपायाने दूर करा केस आणि त्वचेच्या समस्या!
आजकाल जितके काम असते त्यापेक्षा ताणच जास्त असतो.
मुंबई : आजकाल जितके काम असते त्यापेक्षा ताणच जास्त असतो. नोकरी, ट्रफिक आणि आपली लाईफस्टाईल याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. परिणामी त्वचा आणि केसांचे आरोग्यही बिघडते. पण या सर्व समस्यांवर एक उपाय आहे तो म्हणजे एक कप कॉफी. रोज एक कप कॉफी पिणे स्वास्थ्यासाठी अत्यंत चांगले असते. त्याचबरोबर केसांचे आणि त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी कॉफीचा असा वापर करा...
आरोग्याशिवाय एक कप कॉफी केस आणि त्वेचेसाठी फायदेशीर ठरते. कॉफीमुळे त्वचा तजेलदार होते. त्याचबरोबर केसगळती थांबते. कॉफीमध्ये मिनरल्स, अंटीऑक्सिंडेंट यांसारखे आवश्यक घटक असातात. त्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते.
केसांची वाढ होत नसल्यास कॉफीचा कंडीशनर म्हणून वापर करा. कंडीशनरमध्ये कॉफी मिसळून केसांवर लावा. 20-30 मिनिटांनी केस स्वच्छ धुवा. त्यामुळे केस मुलायम व चमकदार होतील.
त्वचेला तजेलदार होण्यासाठी अंटीऑक्सिंडेंट खूप गरजेचे असतात. स्क्रब म्हणून कॉफीचा वापर करा. त्यासाठी कॉफीच्या पावडरमध्ये काही थेंब पाणी घालून पेस्ट बनवा आणि त्याने चेहऱ्याला स्क्रब करा. त्यामुळे तुमच्या त्वचेचे ओपन पोर्स बंद होण्यास मदत होईल.
केसांना कलर करण्यासाठी कॉफी अत्यंत चांगला उपाय आहे. केसांना केमिकल्सयुक्त रंगापासून वाचवण्यासाठी कॉफी पावडरमध्ये पाणी मिसळा आणि केसांना लावा. 10-15 मिनिटे ठेवून केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.