मुंबई : दररोजच्या संभाषणात अशी काही पदार्थांची नावे असतात जे आपण दररोज खातो. मात्र त्यांची इंग्रजी नावे फार कमी लोकांना माहीत असतात. उदाहरणार्थ, परवल या शब्दाला हिंदीत टिंडे म्हणतात. मात्र त्याला इंग्रजीत अॅपल गार्ड असे म्हणतात हे कमी लोकांना माहित असेल..


अशाच काही पदार्थांची नावे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


चिकू - चिकू हे फळ आपण नेहमीच खातो. इंग्रजीतही अनेकदा chikoo असेच स्पेलिंग लिहिले जाते. मात्र याचे इंग्रंजीत नाव आहे.  Sapodilla 



बडिशेप - बडिशेपला हिंदीमध्ये सौंफ असे म्हटले जाते. अनेकदा इंग्रजीतही याचे नाव saunf असे घेतले जाते. मात्र सौंफला इंग्रजीत fennel seeds



दुधी भोपळा - दुधी भोपळ्याला हिंदीत लौकी असे म्हणतात. तर इंग्रजीत Bottle Gourd  म्हणतात.



हिंग - क्वीन सिनेमात कंगना आईला रात्रीच्या वेळेस हिंग शब्दाला इंग्रजी काय म्हणतात हे विचारते. या प्रश्नानंतर तुम्हीही डोके खाजवले असेल. हिंगला इंग्रजीत Asafoetida म्हणतात.



आवळा - आवळा अथवा आमलाला इंग्रजीत Gooseberry म्हणतात.



साबुदाणा - उपवासाला हमखास खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा. या साबुदाण्याला इंग्रजीत Tapioca Sago असे म्हणतात.



ओवा - ओव्याला हिंदीत अज्वाईन असे म्हणतात. अनेकदा इंग्रजीतही याचा उच्चार Ajwain असा केला जातो. मात्र ओव्याचे इंग्रजी नाव Carom Seeds  असे आहे.



मखाणे - ड्रायफ्रुट्समध्ये मखाण्याचा उल्लेख आवर्जून होतो. या मखाण्यांना इंग्रजीत Fox Nuts म्हणतात. 



परवल - तोंडलीची मोठी जात म्हणजे परवल. या परवल भाजीला इंग्रजीत  Pointed Gourd असे म्हटले जाते. 



भजी - भजी हा खाण्यातील नेहमीच पदार्थ. भजीला हिंदीत पकोडे म्हणतात. हेच पकोडे म्हणजे इंग्रजी भाषेतील  Fritters