मुंबई : कोरोनाचे नवीन ओमिक्रॉन प्रकार जगाची चिंता वाढवतंय. आतापर्यंत कोरोनाचा हा व्हेरिएंट 77 देशांमध्ये पोहोचला आहे. भारतातही 11 राज्यांमध्ये या व्हेरिएंटची 100हून अधिक प्रकरणं नोंदवली गेलीत. ओमायक्रॉनचे रूग्ण सापडत असल्याचं चित्र समोर असताना देशातील उपचार व्यवस्था मजबूत करण्याकडे लक्ष दिले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Omicron वर जगभरात पसरलेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी या व्हेरिएंटची काही विशेष लक्षणं ओळखली आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे की, या लक्षणांमुळे ओमायक्रॉनचा व्हेरिएंट लवकर ओळखण्यास मदत होईल. यामुळे लोकांना कोरोनाच्या कहरापासून वाचवण्यातही मोठी मदत होईल.


सुरुवातीच्या काळात घश्यात खवखव


दक्षिण आफ्रिकेचे शास्त्रज्ञ डॉ रायन नोच यांच्या मते, ओमायक्रॉन व्हेरिएंटने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या तपासणीत काही खास गोष्टी ओळखल्या गेल्या आहेत. संशोधनात असं दिसून आलं आहे की, संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात रूग्णांच्या घशात खवखव सुरू होते. यानंतर, त्यांना कोरडा खोकला, नाक बंद होणं आणि स्नायू तसंच पाठीच्या खालच्या भागात घट्टपणाचा त्रास होऊ लागला. 


अनेकांनी सामान्य सर्दी म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं. नंतर तपास केला असता त्याला कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने त्रस्त असल्याचं आढळून आलं, असंही संशोधनात आढळून आलं.


शास्त्रज्ञ ज्युलिएट पुलियम यांनी सांगितलं की, आतापर्यंतच्या तपासणीत ओमायक्रॉन व्हेरिएंट कमी धोकादायक असल्याचं दिसून आलं. म्हणजेच, डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटपेक्षा कमी लोकांचा मृत्यू होतोय. परंतु त्याचा संसर्ग दर सर्वाधिक आहे. या व्हेरिएंटने ग्रस्त व्यक्ती 4-5 लोकांना संक्रमित करू शकतात. त्यामुळे हा प्रकार जवळपास निम्म्या जगापर्यंत पोहोचला आहे.


पुलियम म्हणाले की, हा ओमायक्रॉन व्हेरिएंट अशा लोकांना देखील संक्रमित करतो. दुसरीकडे, कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी, हा व्हेरिएंट अधिक घातक करू शकतो. त्यामुळे त्यांना अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. 


ते म्हणाले की, या प्रकाराचा सामना करताना, उपचार व्यवस्था मजबूत करणं आणि कोविड प्रोटोकॉलचं पालन करणं हा सर्वोत्तम उपाय असू शकतो.