मुंबई : प्रत्येक माणसाला वयानंतर कुटुंब आणि मुलं असावीत अशी इच्छा असते. पण अनेकदा काही लोकांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही. केवळ महिलाच नाही तर पुरुषांना मुलं होण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. काळाच्या ओघात पुरुषांमध्ये मूल न होण्याची ही समस्या अधिकच वाढताना दिसतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हीच बाब लक्षात घेऊन भारत आणि जर्मनीतील प्रजनन तज्ज्ञांच्या पथकाने स्पर्म्सच्या क्वॉलिटी आणि Ejaculation (वीर्य सतत बाहेर पडणं) यांच्यातील संबंध जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.


कस्तुरबा मेडिकल कॉलेज, MAHE-मणिपाल आणि युनिव्हर्सिटी ऑफ म्युन्स्टर, जर्मनीच्या संशोधकांनी Ejaculationची लांबी आणि त्याचा स्पर्म्सवर होणारा परिणाम यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला आहे.


अमेरिकन सोसायटी ऑफ एंड्रोलॉजी आणि युरोपियन अॅकॅडमी ऑफ एंड्रोलॉजीचं  जर्नल अँड्रॉलॉजीमध्ये 1 जुलै रोजी या अभ्यासाची नोंद करण्यात आली.


यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, सतत Ejaculation म्हणजेच वीर्य सतत बाहेर पडणं यापासून दूर राहिल्याने वीर्यमधील स्पर्म्सच्या पेशींची संख्या वाढते. फर्टिलिटी एक्सपर्टनी गर्भधारणेची योजना आखत असलेल्या लोकांना दोन Ejaculation दरम्यान 2 ते 3 दिवसांचे अंतर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. 


तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, सेक्सदरम्यान खूप कमी अंतर ठेवल्याने गर्भधारणेची शक्यता कमी होते.


या अभ्यासच्या परिणामात असं आढळून आले की, जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर स्पर्म्सच्या चांगल्या गुणवत्तेसाठी पुरुषांनी दोन Ejaculation दरम्यान दोन दिवसांचं अंतर ठेवावं. 


दुसरीकडे, ज्या लोकांच्या स्पर्म्सची गुणवत्ता खूपच खराब आहे, त्यांनी ती सुधारण्यासाठी दोन Ejaculation दरम्यान 6 ते 15 दिवसांचे अंतर ठेवणं गरजेचं आहे.