दक्षिण आफ्रिका : कोरोनाच्या नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. मात्र या व्हेरिएंटबाबत आता एक चांगली बातमी समोर आली आहे. ही बातमी ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण मिळालेल्या दक्षिण आफ्रिकेमधून आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनने उच्चांक गाठला होता. मात्र आता सरकारने जनतेला थोडा दिलासा देण्यास सुरुवात केलीये. याठिकाणी रात्रीचा कर्फ्यू हटवण्यात आला आहे. 


Omicronवर मेडिकल एक्सपर्टचं मत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी एक दिलासादायक गोष्ट सांगितली आहे. एम्सचे संचालक म्हणतात की, ओमायक्रॉन धोकादायक नाही आणि त्यासाठी उपस्थितीत ऑक्सिजन सपोर्टची गरज भासणार नाही. 


तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, ओमायक्रॉन फुफ्फुसांवर नव्हे तर आपल्या श्वसनमार्गावर परिणाम करतो आणि शरीरातील अँटीबॉडीज त्याला कमकुवत करतात.


दक्षिण अफ्रिकेत परिस्थिती सुधारली


नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रूग्ण सापडला होता. त्यानंतर या व्हेरिएंटने जगभरात भीतीचं वातावरण निर्माण केलं. या व्हेरिएंटचा प्रसार दर डेल्टा पेक्षा 70 पटीने जास्त आहे. मात्र सध्या दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती सुधारतेय.


मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात नवीन प्रकरणांमध्ये सुमारे 30 टक्क्यांनी घट झालेली पहायला मिळाली. यामुळे एकंदरीतच दक्षिण आफ्रिकेने सुमारे 50 दिवसांत ओमायक्रॉनवर नियंत्रण मिळवलं आहे.


दक्षिण आफ्रिकेतून घटवला नाईट कर्फ्यू


दक्षिण आफ्रिका सरकारच्या म्हणण्याप्रमाणे, देशाने ओमायक्रॉमनमुळे आलेल्या लाटेवर नियंत्रण मिळवलं आहे. या काळात मृतांच्या संख्येत वाढ दिसून आली नाही. त्यानंतर सरकारने नाईट कर्फ्यू तात्काळ उठवला आहे आणि इतर निर्बंधही हटवायला सुरुवात केली आहे.


दक्षिण आफ्रिकेने कसं मिळवलं नियंत्रण?


दक्षिण आफ्रिकेत जाहीर सभांनाही बंदी केली होती. त्याचप्रमाणे रात्री 11 नंतर दारूची दुकानं उघडण्यास बंदी घालण्यात आली होती. यासोबतच दक्षिण आफ्रिकेने लसीकरणावर भर दिला, जेणेकरून लोकांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊल आणि संसर्ग रोखता येईल.