दुधात फक्त `हा` एक पदार्थ मिसळून प्या; झटक्यात कमी होईल सांधेदुखी
Uric Acid Home Remedies: युरीक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी तु्म्हाला किचनमधील पदार्थ उपयोगी ठरतील.
Uric Acid Home Remedies: आजच्या धावपळीच्या आणि आधुनिकतेच्या जगात जेवणाच्या व खाण्यापिण्याच्या सवयी बदलत गेल्या आहेत. त्यामुळं अनेकांच्या मागे विविध आजार मागे लागले आहेत. यातीलच एक समस्या म्हणजे हाय युरिक अॅसिड. हाय युरिक अॅसिडमुळे सांधेदुखीची तीव्र समस्या निर्माण होते. घरातच असलेल्या उपायांनी तुम्ही शरीरात साचलेले युरिक अॅसिड कमी करु शकता. (Ways to Reduce Uric Acid)
युरिक अॅसिड म्हणजे काय?
युरिक अॅसिडची मात्रा वाढल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. युरिक अॅसिड हे शरीरात तयार होणारे एक रसायन आहे. शरीरात असलेल्या प्युरीनचे विघटन झाल्यानंतर ते तयार होते. तुमच्या शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यास अनेक समस्या निर्माण होतात. अशातच पायांमध्ये वेदना जाणवणे आणि सांधेदुखी, पायांना सूज येणे. यावर वेळेत उपचार न केल्यास त्यामुळं अर्थराइटिस आणि ऑस्टिपोरिसिस सारख्या समस्या होतात. त्यामुळं युरिक अॅसिडवर वेळेत उपचार करायला हवा.
युरिक अॅसिडवर अनेक औषध आहेत. मात्र, तुम्ही घरातील पदार्थांचा वापर करुनही तुम्ही युरिक अॅसिडवर मात करु शकता. युरिक अॅसिड कमी करण्यासाठी तुम्ही दूधात एक पदार्थ मिसळून प्यायल्यास खूप लाभदायक ठरु शकते. हळदीचे दूध प्यायल्यास रक्तातील युरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवण्यास मदत मिळते. याचे सेवन कसे कराल, जाणून घेऊया.
हळदीमध्ये अँटी बॅक्टीरियल आणि अँटी इन्फेलेमेटरी गुण आढळतात. त्यामुळं रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याचबरोबर अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. हळदीत असलेले करक्युमिन सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते. शरीरात युरिक अॅसिड वाढले असेल तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही हळदीच्या दूधाचे सेवन करु शकता.
हळदीच्या दूधाचे सेवन कसे कराल?
एका ग्लास गरम दूधात छोटा चमचा हळदी पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करुन घ्या. तुम्हाला हवे असल्यास त्यात एक चुटकीसरशी काळी मिरची मिक्स करु शकता. जर तुम्ही दूध पित नसाल तर गरम पाण्यातही हळद मिसळून पिऊ शकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)