मुंबई : आजकाल मधुमेह हा सर्वसामान्यांमध्ये सर्रास दिसणारा आजार आहे. अनुवंशिकता, चुकीची जीवनशैली, चुकीच्या प्रकारे घेतलेला आहार यांसारख्या अनेक गोष्टींमुळे अनेकांना मधुमेह होण्याचे प्रमाण वाढले आहे. मधुमेह असणाऱ्यांनी नेहमी त्यांची ब्लड-शुगर लेवल नेहमी तपासण्याची गरज आहे. नोकरी करणाऱ्या लोकांनी मधुमेहाकडे अधिक दक्षतेने लक्ष देणे गरजेचे आहे. काही सोप्या पद्धतीने कामाच्या ठिकाणीही मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. 


पुरेसा, भरपेट नाश्ता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वांनीच दररोज सकाळचा नाश्ता केलाच पाहिजे. परंतु मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या नाश्ताकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. मधुमेह असणाऱ्यांनी हेल्दी नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्तात फळं, अंड, दही, धान्य यांचा समावेश करा. 


ब्रेक घेत राहा


ऑफिसमध्ये तुमचं काम बसून, डेस्क जॉब असल्यास प्रत्येक १ ते २ तासांच्या अंतराने ब्रेक घेणे गरजेचे आहे. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. सतत एका ठिकाणी बसून काम केल्याने लठ्ठपणासारखी समस्या उद्धभू शकते. दुपारचे जेवण झाल्यानंतर काही वेळ फिरण्याचा प्रयत्न करा.


ताण घेऊ नका


कामाच्या ठिकाणी लोक अनेकदा तणावात असतात. अधिक ताण घेतल्याने ब्ल़ शुगर लेवल वाढते. त्यामुळे ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते. मेडिटेशन, दिर्घ श्वास घेतल्याने तसेच काही वेळ चालण्यानेही ताण काही प्रमाणात हलका होण्यास मदत होते.


पुरेसे पाणी प्या


दररोज कमीत-कमी २ ते ३ लिटर पाणी प्या. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. पाणी न पियाल्यास शरीर डिहायड्रेटेड होते आणि ब्लड शुगर लेवल वाढते. अधिक कॅफेन असलेले पेय घेऊ नये.