साजूक तुपात अन्न शिजवणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक? काय सांगतात तज्ज्ञ?
Ghee for Cooking : आयुर्वैदात साजूक तूप हे आपल्या आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर मानलं जातं. यात हेल्दी फॅट असतात. अशात जर आपण दररोज साजूक तुपात अन्न शिजवल्यास फायदा मिळतो की नुकसान, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात.
Ghee for Cooking : साजूक तूप आयुर्वेदात औषधापेक्षा कमी नाही. तुपामध्ये हेल्दी फॅट्स आढळतात, ज्यामुळे आपले शरीर सक्रिय राहण्यास खूप मोठी मदत मिळते. साजूक तूप खाल्ल्याने पचनक्रियाही सुधारते असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, कोलेस्ट्रॉलचे रुग्ण त्यांच्या आहारात साजूक तुपाचा समावेश करू शकतात. अनेक घरांमध्ये आजही तेलाऐवजी साजूक तुपात अन्न शिजवतात. (cooking food in desi ghee beneficial or harmful for health What do the experts say)
पण साजूक तुपात शिजवलेले अन्न आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? यासोबतच रोज साजूक तुपात अन्न शिजवावे का? या तुमच्या प्रश्नांचं उत्तर न्यूट्रिशनिस्ट सुमनने दिलंय. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्याने या प्रश्नाचे उत्तर दिलंय. आपल्या आरोग्यासाठी साजूक तुपातील अन्न कितपत सुरक्षित आहे जाणून घ्या.
तज्ज्ञांचे मते, साजूक तुपात निःसंशयपणे हेल्दी फॅट्स आढळतात. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शरीरासाठी हानिकारक असतो. तुपात सॅच्युरेटेड फॅट्स असल्याने ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. त्यात 65 टक्के सॅच्युरेटेड फॅट असते, जे खराब कोलेस्टेरॉलमध्ये बदलते. त्यामुळे सर्व पदार्थ साजूक तुपात शिजवलेले अन्न खाऊ नयेत.
तूप किती खावे?
आता प्रश्न पडतो की किती साजूक तूप खावे? पूर्णपणे तंदुरुस्त आणि सक्रिय व्यक्तीसाठी, दिवसातून 1 ते 2 चमचे साजूक तूप खाणे पुरेसे मानले जाते. हे प्रमाण 5 ते 10 ग्रॅम दरम्यान असावं. यापेक्षा जास्त खाल्ल्याने शरीराला नुकसान होतं, असं तज्ज्ञांचं मत आहे. ज्या लोकांना कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाशी संबंधित आजार आहेत त्यांनी अर्धा चमचा साजूक तूप खावे.
तज्ज्ञांच्या मते, जास्त तूप खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजारही होऊ शकतात. त्यामुळे शिरा ब्लॉकेजची समस्याही उद्भवू शकते. जर तुम्ही प्रत्येक जेवणात साजूक तूप वापरत असाल तर ते तुमच्या पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकतं. इतर कोणत्याही आरोग्याच्या समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच साजूक तूप मर्यादित प्रमाणात खावे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)