मुंबई : आजकाल बाजारात कोथिंबीर खूप स्वस्त आणि मस्त मिळत आहे. कोथिंबीरीचा स्वाद हा प्रत्येक पदार्थाला एक वेगळीच चव देतो. भाजी असो किंवा एखादा खास पदार्थ कोथिंबीर त्याचा स्वाद आणि डेकोरेशनसाठी वापरण्याती पद्धत आहे. तुम्ही जर कोथिंबीर खाण्यासाठी नाक मुरडत असाल तर तुम्ही ती खाणं गरजेचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोथिंबीरीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कोथिंबीर वापरली नाही तर भाजी,मसाले भात किंवा पुलावही अर्धवट वाटतो. आज आपण कोथिंबीरीचे फायदे काय आहेत जाणून घेऊया. 


हिरव्या गार कोथिंबरीमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, के, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक असतात. हे पोषक घटक आपले शरीर तंदुरुस्त ठेवतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 


1. यकृताच्या आजारांसाठी कोथिंबीर खूप फायदेशीर आहे. अल्कलॉइड्स आणि फ्लेव्होनॉइड्स पुरेशा प्रमाणात असतात. पित्त आणि कावीळ यासारख्या आजारांसाठी कोथिंबीर खूप वरदान समजली जाते. 


2. पचन आणि आतड्यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. यामुळे पोट तंदुरुस्त राहतं आणि भूकही चांगली लागते.


3. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोथिंबिरीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात. कोथिंबीर नेहमी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते.


4. कोथिंबीर खाल्ल्याने अनावश्यक अतिरिक्त सोडियम लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडतं. कोलेस्ट्रॉस आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी कोथिंबीरीचं रोज सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. 


5. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी कोथिंबीर लाभदायी आहे.  शरीरात मधुमेह नियंत्रणात राहतो आणि व्यक्तीला तंदुरुस्त वाटतं.


Disclaimer : इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.