मुंबई : मुंबईत कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाहीये. मुंबईच्या पूर्व उपनगरातील मानखुर्द येथील बाल गृहातील मुलांनाही आता कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. बालसुधारगृहातील एकूण 18 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या सांगितले की, यापैकी पंधरा मुलांना शुक्रवारी संसर्ग झाल्याचं आढळलं आहे. त्यानंतर त्यांना चेंबूरमधील एका वेगळ्या वॉर्डात पाठवण्यात आलं. आता आणखी 3 मुलं संक्रमित आढळली आहेत. 


बुधवारी सापडला पहिला रूग्ण


मिळालेल्या माहितीनुसार, "बुधवारी एका मुलाला संसर्ग झाल्याचं आढळलं. यानंतर त्याला त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल केलं गेलं. दुसऱ्या दिवशी, आणखी दोन मुलं कोरोना व्हायरसने संसर्गित असल्याचं आढळलं. इतकंच नव्हे तर शुक्रवारी घेतलेल्या अँटीजन आणि आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये 15 मुलांमध्ये संसर्ग आढळला. ज्यामुळे संक्रमित झालेल्यांची एकूण संख्या 18 झाली. 


गुरुवारी, मुंबई महानगरपालिकेने म्हटलं होतं की, एका खाजगी अनाथालय आणि बोर्डिंग शाळेतील 26 मुले संक्रमित आढळली आहेत. त्यापैकी काही मुलं 12 वर्षाखालील आहेत. या व्यतिरिक्त, ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मधील शासकीय अल्पवयीन सुधारगृह, ज्याला सामान्यतः रिमांड होम म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी 14 मुलांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं, एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले