मुंबई : महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या संख्येत मोठी वाढ झालीये. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत कोरोना संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ झालीये. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे 5000 हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2479 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे 5218 रुग्ण आढळले आहेत. तर बुधवारी महाराष्ट्रात 3260 नवीन रुग्ण आढळले. त्यापैकी एकट्या मुंबईत 1648 नवीन कोविड 19 रुग्ण आढळले होते.


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात 665, नागपूर 135, कोल्हापूर 72, अकोला 63, नाशिक 62, लातूर 31 आणि औरंगाबाद 24 रुग्ण आढळून आलेत. गुरुवारी मुंबईत कोरोनामुळे एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी देशभरात कोरोनाचे 13,313 नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 38 जणांचा मृत्यू झाला आहे. 


दुसरीकडे देशातील एक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 83,990 झाली आहे. देशातील वाढत्या कोरोना प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आढावा बैठकही घेतली.