Corona Death: ऑगस्टमध्ये कोरोनाच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक!
साथीच्या आजारामुळे मृतांचा आकडा दुपटीने वाढला आहे.
मुंबई : दिल्लीत ऑगस्टच्या पहिल्या 10 दिवसांत कोविड-19 मुळे 32 लोकांचा मृत्यू झाला. तर, जुलैच्या शेवटच्या 10 दिवसांत कोरोना व्हायरसने 14 जणांचा बळी घेतला. साथीच्या आजारामुळे मृतांचा आकडा दुपटीने वाढला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, दिल्लीत 1 ऑगस्टला दोन, 2 ऑगस्टला तीन, 3 ऑगस्टला पाच, 4 ऑगस्टला चार, 5 ऑगस्टला दोन, 6 ऑगस्टला एक, 7 ऑगस्टला दोन, 8 ऑगस्टला 6 आणि 9 ऑगस्टला सात मृत्यूची नोंद करण्यात आलीये.
जुलैमध्ये इतक्या मृत्यूची नोंद
दुसरीकडे, जर आपण 22 आणि 23 जुलैबद्दल बोललो, तर अनुक्रमे 24, 25, 26 जुलै रोजी प्रत्येकी एक आणि 27 जुलै रोजी प्रत्येकी दोन मृत्यू झाले. तर 28 जुलै रोजी एकाही संक्रमिताचा मृत्यू झाला नाही. 29 आणि 30 जुलै रोजी प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आणि 31 जुलै रोजी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
दिल्लीत आतापर्यंत मृत्यूंची नोंद
9 ऑगस्ट रोजी झालेल्या मृत्यूची संख्या 180 दिवसांतील सर्वाधिक आहे. दिल्लीत कोविडमुळे 26,343 लोकांनी आपला जीव गमावला आहे. गेल्या एका आठवड्यात राष्ट्रीय राजधानीत संसर्गाची प्रकरणं वाढलीयेतत. संसर्गामुळे मृत्यूचं प्रमाणही वाढताना दिसतंय.
इतर आजारांनीही ग्रस्त रूग्ण
तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे, ज्यांना आधीच कोणत्याही आजाराने ग्रासले आहे किंवा कॅन्सर, टीबी किंवा अन्य गंभीर आजार आहेत अशा लोकांचाच संसर्गामुळे मृत्यू होतोय.