अमेरिका : एखाद्या महामारीचा प्रत्येक व्यक्तीवर सारखाच परिणाम होतो. या महामारीमध्ये पुरुष आणि महिलांच्या मृत्यूचे आकडे सारखेच आहेत. मात्र आता असा एक अभ्यास झाला ज्यानुसार असं लक्षात येतंय की, कोविड -19 महामारीमुळे पुरुषांचा मृत्यू दर महिलांपेक्षा जास्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीला, काही संशोधक आणि आरोग्य तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, याचं कारण अनुवांशिक आहे. शास्त्रज्ञांनी असा संशय व्यक्त केला की, पुरुषांच्या उपचारादरम्यान इस्ट्रोजेन किंवा एंड्रोजन ब्लॉकर्सचा वापर करून पुरुषांमधील मृत्यूचा धोका कमी केला जाऊ शकतो. 


अमेरिकेतील लैंगिक फरकांवर केलेल्या संशोधनानुसार हे सांगणं अतिशय कठीण असल्याचं  म्हटलंय. कारण महिलांपेक्षा पुरुषांचा मृत्यू झाला आहे. संशोधकांचा असा दावा आहे की, याला विविध कारणं जबाबदार असू शकतात. उदाहरणार्थ, हे वेगवेगळ्या नोकर्‍या आणि आरोग्याशी संबंधित फरक इत्यादी.


काहीही ठोस सांगणं कठीण


हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या जेंडरस्की लॅबच्या संचालिका सारा रिचर्डसन यांच्या टीमने महिला आणि पुरुषांच्या संसर्ग आणि मृत्यूबद्दल डेटा गोळा करण्यास सुरुवात केली. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2021 पर्यंतच्या डेटाचा विचार करण्यात आला. महिला आणि पुरुषांच्या कोविड प्रकरणांची गणना करण्यासाठी हा एकमेव सोर्स होता.


न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, सुमारे 55 आठवडे चाललेल्या या अभ्यासात असं दिसूलं की कोरोनाची वाढती प्रकरणं पुरुष आणि महिलांमध्ये समानच राहिली. परंतु मृत्यूचे आकडे वेगवेगळे होते. महिलांपेक्षा पुरुषांचा मृत्यू झाला असल्याचं लक्षात आलं.


मात्र जीन्स, हार्मोन्स किंवा इम्यून रिस्पॉन्समधील जेंडर डिफ्रेंसेसद्वारे हे स्पष्ट केलं जाऊ शकत नाही, असं या अभ्यासातून समोर आलं.