मुंबई : बऱ्याचदा आपल्याला रात्री झोपल्यावर घाम येतो. यामागची कारणं वेगवेगळी असू शकतात. जसे उन्हाळ्याचा सिझन, पंखा नसते आजूबाजूला भट्टी असणे इत्यादी. खरंतर रात्री घाम येणं आपण अगदी सामान्य मानतो, परंतु आता असं करु नका. कारण रात्रीचा घाम येणे हे कोविडच्या नवीन स्ट्रेनचे लक्षण असू शकते, असा तज्ञांचा दावा आहे. बायोकेमिस्ट्रीचे प्राध्यापक ल्यूक ओ'नील यांनी दावा केला आहे की, रात्रीची झोप आता दुःखाचे कारण बनू शकते, कारण कोरोनाव्हायरस विकसित विषाणूची लागण झालेल्या लोकांना रात्री झोपेत भरपूर घाम येत असल्याची लक्षणं आढळून आली आहे. ज्यामुळे तुम्ही देखील या समस्येपासून त्रस्त असाल, तर जरा सावध व्हा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या घामाचा आजार प्रौढ आणि मुले दोघांनाही होऊ शकतो. यामुळे तुमच्या खोलीतील तापमान थंड असलं, तरीही तुम्हाला घाम येऊ शकतो. त्यामुळे प्रोफेसर ओ'नील चेतावणी देतात की, असं जर तुम्हाला होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.


'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, घाम येणे या आजारात थोडे वेगळे आहे, कारण त्याचे व्हायरसमध्ये रूपांतर झाले आहे. शरीराच्या टी पेशींमध्ये काही प्रतिकारशक्ती असते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि विषाणू यांचे थोडे वेगळे मिश्रण होऊन हा आजार होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला रात्री घाम येतो.


सध्या नवीन आजार आणि लक्षण लक्षात घेता लसीवर भर दिला जात आहे. थंडीत कोरोनाची नवी लाट येण्यापूर्वी नवीन लसीकरण केले जाईल. यापैकी, फायझर आणि मॉडर्नाकडे सप्टेंबरपर्यंत ओमिक्रॉन लस आणि ऑक्टोबरपर्यंत BA.4/5 लस असेल.


ल्यूक ओ'नील याचं ब्रिटनसंदर्भात वक्तव्य


ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या म्हणण्यानुसार, असे आढळून आले आहे की, प्रत्येक 25 पैकी एक ब्रिटीश अजूनही कोविडने संक्रमित आहे. गेल्या आठवड्यात संपूर्ण ब्रिटनमध्ये एकूण 2.7 दशलक्ष लोक कोविड चाचणीत पॉझिटिव्ह आढळले. गेल्या तीन महिन्यांतील हा उच्चांक आहे. त्याचवेळी हा रेट लवकरच शिगेला पोहोचेल, अशी चिन्हे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.