BBV154 vaccine: कोरोनाविरुद्धच्या लढाईला मोठं यश, Nasal Vaccine ची तिसरी चाचणी यशस्वी
देशात लवकरच कोरोनावरची पहिली नेझल लस उपलब्ध होण्याची शक्यता
BBV154 vaccine: कोरोनाविरुद्धच्या लढाईत मोठं यश हाती आलं आहे. देशात लवकरच पहिली नेझल लस (Nasal Vaccine) उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारत बायोटेकनं (Bharat Biotech) लसीची (Vaccine) तिसरी चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केलीय.
त्यामुळे BBV154 इंट्रानेझल कोविड व्हॅक्सिन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झालाय. ही लस सर्वात सुरक्षित आणि कोरोनावर (Corona) अत्यंत प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकनं केलाय.
नेझल लसीची तिसरी चाचणी यशस्वी झाल्यानंतर या लसीच्या वापराला लवकरच मान्यता मिळेल असंही भारत बायोटेकनं म्हंटलंय. या लसीचं वैशिष्ट्य म्हणजे ही लस इंजेक्शनद्वारे न देता नाकावाटे दिली जाईल.
अहवालानुसार BBV-154 अनुनासिक लसीच्या पहिल्या आणि दुसर्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये ती यशस्वी झाली होती. ज्या लोकांना याआधी पहिली आणि दुसरी लस मिळाली होती, त्यांच्यावर या लसीची तिसरी चाचणी करण्यात आली. आता मानवी क्लिनिकल चाचणी डेटा मंजुरीसाठी राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाकडे पाठविला गेला आहे.
पहिल्या टप्प्यातील चाचणीत स्वयंसेवकांना लस देण्यात आली होती, त्यांच्यावर लसीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसून आले नव्हते.