मुंबई : कोरोना व्हायरच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. Covid-19 चा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक आहे. त्यामुळे त्याच्यापासून बचावासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्स ठेवणं महत्त्वाचं आहे. आरोग्या मंत्रालयाने म्हटलं की, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. घरात गरज पडल्यास N-95 मास्क वापरा. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी इम्युनिटी मजबूत असली पाहिजे. त्यामुळे व्हिटीमिन सी युक्त फळे खायला हवीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत सरकारने नैसर्गिक पद्धतीने इम्यून सिस्टम बूस्ट करण्यासाठी सल्ला दिला आहे. सरकारने याबाबत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.


- आवश्यक पोषक तत्व मिळण्यासाठी रोज वेगवेगळ्या रंगाची फळे आणि भाज्या खायल्या हव्यात. ज्यामुळे शरिरात व्हिटामिन आणि मिनरल्सची कमतरता भासणार नाही.


- रोजाना काही प्रमाणात डार्क चॉकलेट खा. पण यामध्ये 70 टक्के कोकोआ असलं पाहिजे. कारण कोकोआ युक्त डार्क चॉकलेट खाल्याने तणाव कमी होतो.


- इम्यून सिस्टम मजबूत करण्यासाठी हळदीचं दूध प्यायला हवे.


- कोरोना संक्रमित लोकांच्या तोंडाची चव निघून जातो. त्यामुळे सॉफ्ट वस्तू खायला हव्यात. आमचूरचा वापर करु शकता.


- कोरोना संक्रमित रुग्णांना व्हिटामिन आणि प्रोटीन युक्त गोष्टीचं सेवन केलं पाहिजे. ज्यामुळे मसल्स आणि इम्युनिटी मजबूत होते. डायटमध्ये चिकन, मासे, ड्रायफ्रुट्स, अंडी, पनीर आणि सोयाबीन यांचा समावेश केला पाहिजे.


- अक्रोड, बदाम, मोहरीचे तेल वापरले पाहिजे.


- रोज योगा आणि श्वसनाचा व्यायाम करावा.


बातमीतील टिप्स हे सामान्य परिस्थितीसाठी आहेत. ज्यांना काही त्रास असेल त्यांनी आधी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.