दिल्ली : जवळपास गेल्या 2 वर्षांपासून आपण प्रत्येकजण कोरोनाच्या महामारीशी लढतोय. कोरोना संसर्गामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. या महामारीमुळे वर्षभर लोकांना घरात बसावं लागलं आहे. रूग्णसंख्या कमी होत असल्याचं लक्षात येताच डेल्टा आणि ओमायक्रॉन या व्हेरिएंटने पुन्हा एकदा चिंता वाढवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान या सर्वांमध्ये आता एक दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. डेनमार्कच्या Epidemiologist टायरा यांनी दावा केला आहे की, ओमायक्रॉन व्हेरिएंटनंतर कोरोना संपेल. हा या महामारीचा शेवटचा व्हेरिएंट असणार आहे. त्यानंतर नागरिक पहिल्याप्रमाणे त्यांचं आयुष्य जगू शकणार आहेत.


द सनच्या बातमीनुसार, ओमायक्रॉन व्हेरिएंट लवकरच संपुष्टात येणार आहे. हा कोरोनाचा शेवटचा काळ आहे. 


टायराच्या बातमीनुसार, 60 दिवसात आयुष्य पूर्वीप्रमाणेच असेल. एकदा ओमायक्रॉन संपला की, त्यानंतर कोरोनाचा काळंही संपेल. टायरा डेन्मार्कच्या स्टेट सीरम इन्स्टिट्यूटमध्ये चीफ epidemiologist आहेत.


ओमायक्रॉनची लक्षणं अतिशय सौम्य प्रकारची दिसून आली आहेत. ओमायक्रॉन फार जलद गतीने पसरतो. जानेवारीच्या शेवटच्या दिवसात त्याचा प्रभाव खूप जास्त असेल. परंतु फेब्रुवारीमध्ये त्याचा प्रभाव कमी होईल. लवकरच कोरोनापासून मुक्ती मिळण्याची आता आशा असल्याचं टायरा यांनी सांगितलंय.