मुंबई : जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने चिंता वाढवली आहे. चीन आणि युरोपातील देशांमध्ये रूग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून येतंय. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 (स्टील्थ ओमायक्रॉनमुळे) ही रूग्णसंख्या वाढतेय. त्यातच आता कोरोनाचा अजून एक XE व्हेरिएंट सापडला आहे. हा व्हेरिएंट ओमायक्रॉनपेक्षा अधिक संक्रामक असल्याचं म्हटलं जातंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, युकेच्या काही भागांमध्ये याची प्रकरणं दिसून आली आहेत. आतापर्यंत असलेल्या माहितीनुसार, स्टील्थ ओमायक्रॉनपेक्षा हा व्हेरिएंट 10 पटीने अधिक संक्रामक असू शकतो. 


2 ओमायक्रॉन स्ट्रेनचं मिश्रण


जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात, XE व्हेरिएंट हा हायब्रिड व्हेरिएंट म्हणून सूचित केला आहे. हा ओमायक्रॉनचा BA.1 आणि BA.2 यांच्या मिश्रणाने तयार झालेला व्हेरिएंट आहे. यापूर्वी देखील व्हेरिएंटचं मिश्रण पाहायला मिळालं होतं. 


2 व्हेरिएंटचं मिश्रण किती धोकादायक?


कोरोनाचा XE व्हेरिएंट हा अधिक धोकादायक मानला जातोय. मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दोन व्हेरिएंट्स एकत्रिय येणं ही चिंतेची बाब नाही. युकेच्या हेल्थ एजंसीच्या प्रमुख डॉ सुसान हॉपकिंस यांच्या म्हणण्याप्रमाणे, कोणत्याही कोरोना व्हेरिएंट्ससोबत दुसऱ्या व्हेरिएंटचं मिश्रण हे धोकादायक नाही. मात्र तरीही याला हलक्यात घेऊ नये.


व्हेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणून वर्गीकृत


जागतिक आरोग्य संघटनेने या नव्या व्हेरिएंटचा धोका पाहता त्याला 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' या श्रेणीत वर्गीकृत केलं आहे. या व्हेरिएंटबाबत जास्त माहिती नसल्याने त्याचा धोका किती असू शकतो हे सांगू शकत नाही, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.