मुंबई : देशात सोमवारच्या तुलनेत आज मंगळवारी कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये 28 टक्के घट झाल्याचं दिसून आलं आहे. 30 ऑगस्ट रोजी कोरोनाची 43 हजारांहून अधिक प्रकरणं नोंदवली गेली. पण 31 ऑगस्टला हा आकडा 30,941 वर आला. म्हणजेच एकूण 28 टक्के कपात झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळमध्ये गेल्या 4 दिवसांपासून 30 हजारांहून अधिक प्रकरणं येत होती. पण काल ​​संध्याकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, तेथे एका दिवसात 19,622 नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. यामुळे देशाचा आलेखही घसरला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात सुमारे 3700 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. हे पाहता, राज्य सरकारने सध्या कोणत्याही प्रकारच्या गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.


देशात कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 350 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर केरळमध्ये 132 लोकांनी आपला जीव गमावला, याशिवाय ओडिशामध्ये 67 लोकांनी आपला जीव गमावला. भारताचा रिकव्हरी रेट सध्या 97.53 टक्के आहे. गेल्या 24 तासांत एकूण 36,275 रुग्ण बरे झाले आहेत, ज्यामुळे देशभरात बरे झालेल्यांची एकूण संख्या 3,19,59,680 झाली आहे. भारतात सक्रिय प्रकरणांची संख्या 3,70,640 आहे. गेल्या 24 तासांमध्ये सक्रिय प्रकरणांमध्ये 5,684नी घट झाली आहे.


कोरोना लसीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. सोमवारपर्यंत देशात लसीचे 64 कोटी डोस देण्यात आले आहेत. 31 डिसेंबरपर्यंत 94 कोटी प्रौढांना एकूण 188 कोटी डोस पुरवण्याचे लक्ष्य आहे. लसीच्या वाढत्या पुरवठ्यामुळे हे लक्ष्य वेळेपूर्वीच साध्य होईल अशी आशा आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना आहे.