मुंबई : शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी राज्यात 2,922 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुख्य गोष्ट म्हणजे, 1745 रूग्ण एकट्या मुंबईत पॉझिटिव्ह आढळले आहेत.


मुंबईत 888 रूग्ण रिकव्हर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 1,745 नवीन रुग्ण आढळून आले असून एका कोरोनाग्रस्त रूग्णाचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान 888 लोक कोरोनामधून बरे झाले असून घरी परतले आहेत. मुंबईत कोरोनाचा वेग इतका वाढला आहे की, काही आठवड्यांत कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पाचपटीने वाढ झाली आहे. मुंबईत सध्या 10,047 एक्टिव्ह रुग्ण आहेत.


एका दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवारी महाराष्ट्रात 3081 कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद झाली असून मुंबईत 1956 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनाचा सर्वात भयावह वेग महाराष्ट्रातच दिसून येतोय. राज्यात आठवडाभरात नवीन रुग्णांची संख्या जवळपास तिपटीने वाढली आहे. त्याचवेळी मुंबई पुन्हा एकदा हॉटस्पॉट बनत आहे.


मुंबईत एकाचा मृत्यू 


आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत या मृत्यूची नोंद झाली आहे. 


देशात कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता केंद्र सरकार अलर्टवर आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, चार महिन्यांपासून संसर्ग कमी होत होता, परंतु गेल्या 20 दिवसांपासून नवीन प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.