मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक ऑफिस, शाळा, कॉलेज बंद आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी जवळपास 8 ते 10 तास घरी लॅपटॉववर काम करत असल्याचं चित्र आहे. अनेक विद्यार्थीही लॅपटॉपवर काही ना काही बघत असतात. मात्र सतत लॅपटॉपसमोर बसणं डोळ्यांसाठी त्रासदायक ठरु शकतं. सतत स्क्रिनवर बघत राहिल्याने डोळ्यांवर ताण, स्ट्रेस येतो. डोळ्यांवर सतत ताण येणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करताना, काळजी घेण्याच्या दृष्टीने काही गोष्टी लक्षात ठेवण गरजेचं आहे.


लॅपटॉप कशाप्रकारे डोळ्यांवर परिणाम करतो? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिक काळापर्यंत लॅपटॉपचा वापर करणं आणि स्क्रिनसमोर तासंतास बसून राहिल्याने डोळ्यात स्ट्रेन किंवा ड्राय आईजची समस्या निर्माण होऊ शकते. हेल्थ एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार, लॅपटॉप स्क्रिनमधून निघणारा निळ्या रंगाचा प्रकाश डोळ्यांसाठी हानिकारक आहे. मेडिकल रिसर्च ऍन्ड ओपिनियनमध्ये छापण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, ड्राय आईजचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच होत नसून तो कामाच्या संपूर्ण प्रोडक्टिविटीवरही होत असतो.


काय आहे ड्राय आय सिंड्रोम?


ड्राय आईज म्हणजे एकतर डोळ्यांमध्ये अश्रू किंवा पाणी कमी तयार होत किंवा त्याची गुणवत्ता चांगली राहत नाही. डोळ्यांमध्ये ड्रायनेस वाटणं, खाज किंवा जळजळ वाटणं, सतत डोळे चोळत राहण्यासारखं वाटणं ही ड्राय आईजची लक्षण असू शकतात. त्याशिवाय, सतत डोळ्यांत काहीतरी गेलं आहे असं वाटणं, विनाकारण डोळ्यांतून पाणी येणं, डोळ्यांमध्ये थकवा किंवा डोळे बारिक होणं ही देखील ड्राय आयची लक्षण असू शकतात.


सतत वाढतं प्रदूषण, सतत लॅपटॉप किंवा कंम्प्यूटरचा वापर, सतत एसीचा वापर, ताण-तणाव, उच्च रक्तदाब ही ड्राय आईज सिंड्रोमची प्रमुख कारणं ठरु शकतात.


coronavirus : रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या या घरगुती टिप्स पाहाच...


काय काळजी घ्याल -


- काम करताना प्रत्येक तासाला 15 ते 20 मिनिटांचा ब्रेक घ्या आणि एखाद्या दूरवरच्या गोष्टीकडे बघण्याचा प्रयत्न करा.
- लॅपटॉप स्क्रिनमधून ब्रेक घेणं म्हणजे असं नाही की टीव्ही किंवा मोबाईल पाहणं. लॅपटॉपमधून ब्रेक घेतल्यानंतर एखादं गाणं ऐका किंवा इतरांशी बोला.
- डोळे लाल होत असल्यास, डोळ्यांमध्ये खाज, जळजळ, पाणी येत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही आय ड्रॉपचा वापर करु नका.
- चश्मा वापरत असाल तर तो नेहमी स्वच्छ ठेवा.
- डोळ्यांना सतत हात लावू नका.
- झोपून लॅपटॉपवर काम करु नका.
- अगदी कमी उजेड किंवा कमी लाईट असलेल्या खोलीत लॅपटॉपवर काम करु नका.