बिजिंग : सध्या जगभरात कोरोना व्हायरसची चर्चा आहे. कोरोना व्हायरस हा जेवढ्या वेगाने पसरतोय, त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने त्याच्याविषयी अफवा पसरत आहेत. तेव्हा नेमकं जाणून घ्या, कोरोना व्हायरसची ज्याला लागण झाली त्याचा मृत्यू अटळ? असतो का, हे किती खरं किती खोटं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याच्या 17 केसेस समोर आल्या आहेत. यात फक्त चीनमध्येच 361 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या बाहेर देखील 150 पेशंट आहेत, त्यातील फिलिपाईन्समध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. 


चीनच्या वुहान शहरात 75 हजारपेक्षा जास्त लोकांना या कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कोरोना व्हायरस हा वुहान शहरातूनच पसरला होता.


युनिवर्सिटी ऑफ हॉन्गकॉन्गचा अंदाज आहे की, अधिकृत आकड्यापेक्षा हा आकडा कितीतरी जास्त असू शकतो.


मेडिकल जर्नल लांसेटच्या अहवालानुसार, ज्या लोकांचा मृत्यू कोरोना व्हायरसने झाला आहे, त्यातील लोक पहिल्यांदा कोणत्या न कोणत्या आजाराचा सामना करत होते.


अहवालानुसार, वुहानच्या जिनितान हॉस्पिटलमध्ये ज्या 99 लोकांचा इलाज सुरू होता, त्यातील 40 लोकांना हृदयरोग होता आणि रक्तनलिका देखील कमजोर होत्या, तर 12 लोकांना डायबेटीज होता.


या व्हायरसची ज्या लोकांना लागण होते, त्यांना पहिल्यांदा ताप येतो, यानंतर कोरडा खोकला सुरू होतो, यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो.


पण या व्हायरसची ज्यांना लागण झाली, ते लोकपूर्णपणे बरे होण्याची शक्यता संपत नाही. कारण अनेक वेळा असं होतं की साधा फ्लू देखील तो असू शकतो.


चीनमधील राष्ट्रीय हेल्थ कमिशन एनएचसीच्या एका तज्ज्ञानुसार,  कोरोना व्हायरसची ही साथ एक ते दोन आठवड्यात नियंत्रणात आणता येऊ शकते.


टॉप हेडलाईन्स


भरचौकात शिक्षिकेला जाळलं, घटनेविरोधात विद्यार्थिनींचा आक्रोश


कोरोना व्हायरसची ज्याला लागण झाली त्याचा मृत्यू अटळ?


लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अफलातून अभिनय,विनोदाचं टायमिंग एकदा पाहाच....


लोणीकरांनी 'हिरॉईन' उल्लेख केलेल्या महिला तहसीलदार सुट्टीवर


कुणाल कामरा राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर