मुंबई : गेल्या 2 वर्षांपासून जगभरात कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. याचा परिणाम केवळ आपल्या शरीरावर आणि मनावर होत नाही तर आपल्या संपूर्ण जीवनशैलीवर होतोय. कोरोनामुळे, घरी असलेल्या लोकांचं वजन वाढत आहे, होम स्क्रीनच्या कामामुळे वेळ वाढला आहे आणि जास्त खाणं ही सवय बनली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकूणच, कोरोनाने आपल्यात बरेच बदल केले आहेत. काही लोकांमध्ये, कोविडचा प्रभाव बराच काळ टिकत असल्याचं दिसून आलंय. कोरोनाचा आपल्या शरीराच्या कोणत्या भागांवर कसा परिणाम झाला हे जाणून घ्या.


हृदयावर परिणाम


सौम्य कोविडमध्ये हृदयावर क्वचितच परिणाम झाला असेल, परंतु कोरोनाच्या गंभीर प्रकरणांमध्ये त्याचा हृदय आणि फुफ्फुस या दोन्हींवर परिणाम झाल्याची शक्यता आहे. काही लोक औषधांनी बरेही झालेत. पण महामारीच्या काळात उच्च रक्तदाब नियंत्रण दरही घसरला होता. 


फुफ्फुस


कोरोना पहिल्यांदा फुफ्फुसावर हल्ला करतो, पण कोरोनातून बरे झाल्यानंतर फुफ्फुसांची स्थिती काय असते. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, 'कोरोना फुफ्फुसांना इजा करतो, तो बरा झाल्यावर फुफ्फुसाची क्षमता कमी होते. फुफ्फुसं स्वतःच संकुचित होत नाहीत, याला स्कारिंग म्हणतात. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, कोविड नंतर, ज्या लोकांची स्थिती हवामान बदलामुळे अधिक गंभीर झाली आहे, त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे.


केसांवर परिणाम


कोरोनानंतर लोकांच्या केसांवरही परिणाम झाला आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर अनेक महिने लोकांना केसगळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते. भारतीय स्कॅल्प तज्ज्ञ म्हणतात की, त्यांनी 'कोविडनंतर केस गळण्याची' अनेक प्रकरणं पाहिली आहेत. 


दातांवर परिणाम


साथीच्या आजारानंतर रूट कॅनल्स आणि दंत तपासणी वाढली आहे. तोंडाच्या स्वच्छतेच्या अभावामुळे तोंडात बॅक्टेरिया वाढू लागतात जे तोंडातून फुफ्फुसापर्यंत पोहोचतात. कोरोना रक्तवाहिन्यांना संक्रमितही करू शकतो. त्यामुळे दात, हिरड्या आणि जिभेपर्यंत रक्त पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. 


त्वचा


सुजलेले ओठ, चेहऱ्यावर पुरळ येणं ही चिंतेची बाब बनली आहे. काही लोकांना N95 किंवा चांगल्या प्रतीचे मास्क घातल्यामुळे त्वचेवर जास्त जळजळ होते. मास्क व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी खूप प्रभावी आहेत, त्यामुळे त्याच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाऊ नये. काही वेळा मास्क न धुतल्याने आणि घाम आल्यानेही त्वचेला संसर्ग होऊ लागतो. त्यामुळे मास्कच्या स्वच्छतेकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.