Corona Vaccine ठरतेय जीवघेणी; अभ्यासातून धक्कादायक खुलासा
Corona News : कोरोना लसीबाबत रोज नवीन खुलासे होताना दिसतायत. याच दरम्यान कोरोनाबाबत सर्वात धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, 28 दिवसांच्या आत 18-39 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यूच्या घटनांमध्ये 84% वाढ झाल्याचे दिसून आले.
Corona vaccine : जवळपास दोन वर्षांपासून जगभरातील लोक कोरोना व्हायरसच्या (coron virus) कहरामुळे त्रस्त आहेत. या विषाणूबाबत जगभरातील शास्त्रज्ञ विविध संशोधन करत असले तरी अद्याप कोणालाच याबाबत अचूक माहिती मिळालेली नाही. कोरोनाबाबत रोज नवीन खुलासे होताना दिसतायत. याच दरम्यान कोरोनाबाबत सर्वात धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, कोरोना विषाणू चाचणीचे निकाल दिवस आणि रात्रीनुसार बदलू शकतात. (covid19 mrna vaccine increases risk of cardiac related death news in marathi)
कोरोनाच्या मेसेंजर रायबोज न्यूक्लिक अॅसिड (mRNA) लसीबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. एका रिर्सचमधून निर्देशनात आले की, mRNA हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी (Heart and blood vessels) मृत्यूच्या वाढीव जोखमीशी संबंधित आहे. फ्लोरिडाचे सर्जन (Surgeon of Florida) जनरल आणि राज्य आरोग्य अधिकारी डॉ. जोसेफ ए. लाडापो म्हणाले की mRNA लसीमुळे 18 ते 39 वयोगटातील पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यूचा धोका जास्त प्रमाणात दिसून आले आहे.
डॉ. जोसेफ यांनी ट्विट केले की, आज आम्ही कोविड-19 mRNA लसीच्या (corona vaccine) विश्लेषणाविषयी सांगत आहोत. ज्याबद्दल लोकांनी जागरूक असले पाहिजे. ते पुढे म्हणाले की mRNA लसीच्या विश्लेषणात लसीकरणानंतर 28 दिवसांच्या आत 18-39 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यूच्या घटनांमध्ये 84% वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
ते पुढे म्हणाले की, मायोकार्डिटिस (Myocarditis) आणि पेरीकार्डिटिस (Pericarditis) सारख्या पूर्व-अस्तित्वात असलेल्या हृदयविकाराच्या स्थिती असलेल्या लोकांनी लस घेताना विशेष खबरदारी घेतली पाहिजे. कोणत्याही औषधाची किंवा लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकतेचा अभ्यास हा सार्वजनिक आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. mRNA लसींबाबत सुरक्षिततेकडे फारसे लक्ष दिले गेले नाही आणि अनेक लोकांच्या चिंता फेटाळल्या गेल्या आहेत.
mRNA म्हणजे काय
मेसेंजर हे आरएनए तंत्रज्ञान आहे. या प्रकारचा आरएनए हा डीएनएचा एक क्रम आहे. ही प्रथिने बनवण्याची ब्लूप्रिंट आहे. mRNA लसीतील mRNA स्पाइक प्रोटीनची अनुक्रम माहिती धारण करते. mRNA लिपिड फॉर्म्युलेशनने झाकलेले असते. हे शरीरात इंजेक्शन दिले जाते. हे शरीराच्या पेशींमध्ये स्पाइक प्रोटीन बनवते. स्पाइक प्रोटीन कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवते.
भारतात कोणती mRNA लस आहे
भारतात, पुणेस्थित जेनोव्हा बायो फार्मास्युटिकल कंपनीकडून एमआरएनए लस GEMCOVAC-19 च्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे. mRNA लस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे ही लस 2 ते 8 डिग्री सेल्सियस तापमानात स्थिर राहते. एका कुपीमध्ये त्याचे पाच डोस आहेत, जे इंट्रामस्क्युलर इंजेक्शनद्वारे शरीरात इंजेक्शनने दिले जातील. पहिल्या डोसनंतर 28 दिवसांच्या अंतराने दुसरा डोस घेतला जाईल.