मुंबई : आजकाल कॉरपरेट क्ष्रेत्रामध्ये काम करणार्‍या लोकांमध्ये विविध स्तरावर ताणतणाव असल्याचं आढळून आलं आहे. हा ताण केवळ कामामुळे  किंवा तुमच्या सहकार्‍यांमुळे नव्हे तर ऑफिसच्या डिझाईनवरही अवलंबून आहे. ऑफिसचं डिझाईन आणि ताण यांचा एकमेकांवर प्रभाव असतो असे एरिजोना युनिव्हार्सिटीच्या संशोधकांनी सांगितले आहे. हा अहवाल अ‍ॅक्युपेशनल अ‍ॅन्ड एनव्हायरमेंट मेडिसीनमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. 


आसनव्यवस्थेचा आरोग्यावर परिणाम  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशोधनातून समोर आलेल्या अहवालानुसार, क्युबिकल सिटिंग असलेल्या ऑफिसमध्ये काम करणार्‍यांवर अधिक तणाव असतो. या प्रयोगाकरिता 231 कर्मचार्‍यांचा अभ्यास करण्यात आला. तीन दिवसांसाठी या कर्मचार्‍यांना खास सेंसर घालायला देण्यात आला होता. याद्वारा त्यांच्यावरील ताणतणाव आणि शरीराच्या अनेक क्रियांवर लक्ष ठेवण्यास आले होते. 


काय आहे संशोधकांचा दावा ?  


ऑफिसचं डिझाईन कर्मचार्‍यांच्या आरोग्यावर सहाजिकच परिणाम करतो. मात्र हा अभ्यास केवळ निरीक्षण आणि परिक्षणाच्या आधारे आहे. प्रत्येक व्यक्तीवर असणारा ताण अनेक कारणांमुळे प्रभावित होऊ शकतो. तसेच महिलांच्या तुलनेत पुरूष ऑफिसमध्ये  फिजिकली अधिक अ‍ॅक्टीव्ह असतात. 


संशोधकांच्या दाव्यानुसार ओपन सिटींग प्लानमध्ये कर्मचार्‍यांनी बसावे असे सांगत असले तरीही यामुळे कर्मचार्‍यांच्या एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो.