Dahi Benefits : आयुर्वेदानुसार दही खाण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ
Dahi Benefits in Marathi : रोज दही खाणे आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं की नुकसानदायक हे तुमची दही कसं खाता आणि कोणत्या वेळी खाता यावर अवलंबून असतं.
Dahi Benefits in Marathi : आजही अनेक लोक दूध, तूप आणि दहीचं नाव घेतलं की तोंड वाकडं करतात. दूध, तूप आणि दही खाण्याचे फायदे माहिती असूनही यापासून दूर पळतात. काही लोकांचा समज असतो दूध, तूप आणि दही खाल्यामुळे वजन वाढतं. प्रोटीनयुक्त हे पदार्थ असूनही लोक याचं सेवन करत नाही. काही जण तर दही खाल्ल्यामुळे सर्दी होते, या अन् त्रास होतो अशी कारणं देतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की दररोज दह्याचे सेवन केल्यास अनेक फायदे आहेत. दही खाण्यामुळे हाड मजबूत होतात, हृदय निरोगी राहत आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. रक्तदाब आणि उच्च रक्तदाब कमी करण्यास दही मदत करते. पण आयुर्वेदानुसार दही खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ तुम्हाला माहिती नसेल तर हेच दही तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरतं. काही पदार्थांना दही लावून बनवले जातात. त्यामुळे दह्याच्या मिश्रण असलेले पदार्थ हे गरम करु नयेत. कारण यामुळे दह्यातील पौष्टिक तत्व नष्ट होतात. (Dahi Benefits According to Ayurveda right way and right time to eat curd)
लठ्ठपणा, कफ, रक्तस्त्राव किंवा सूजची समस्या असलेल्या लोकांनी दह्याचं सेवन करु नये. आयुर्वेद तज्ज्ञ आणि डॉक्टर सांगतात की, रात्रीच्या वेळी दह्याचं सेवन टाळा. त्याशिवाय रोज दह्याचं सेवन करणे अयोग्य मानलं जातं. मात्र तुम्ही काळं मीठ, काळं मिरे आणि जिरं टाकून ताक रोज घेऊ शकता.
फळांसोबत दह्याचं सेवन करु नका. त्यामुळे तुम्हाला अॅलर्जी आणि पचनासंबंधी समस्या होऊ शकतात. तसंच चिकन, मटन किंवा मासे यासोबत दह्याचं सेवन करु नये. त्यामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होतात.
असं करा दह्याचं सेवन!
रोज दह्याचं सेवन करु नका. तसंच दही हे दुपारी एक वाटी तुम्ही खाऊ शकता पण रात्री दह्याचं सेवन करु नका. जर तुम्हाला दही खायला आवडत नसेल तर तुम्ही ताक घेऊ शकता. यामुळे तिच्या शरीरातील उष्णता कमी होईल. पचन शक्ती वाढण्यास मदत होते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)