रोज १० मिनिटं रश्शी उडी मारा, होतील हे फायदे
जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे करु शकता
मुंबई : दगदगीच्या आयुष्यात स्वत: च्या शरीराची काळजी घेणं दुरापस्थ होऊनन जात. खाण्या-पिण्याच्या अनियमित वेळा, आराम न मिळणं, वाढत वजन अशा अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर रश्शीउडी हा तुमच्यासाठी कमी वेळातील व्यायाम आहे. रश्शी उडीचे खूप फायदे आहेत. रोजच्या शेड्युल्डमधून थोडा वेळ काढून तुम्ही शरीरासाठी खूप सारा लाभ मिळवू शकता. १० मिनिट रश्शी उडी मारल्याने रक्त प्रवाह सरळ होतो. यामुळे हृदयासंदर्भातील आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. वाढत्या वजनाचा त्रास असणाऱ्यांना याचा जास्त फायदा होईल. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे करु शकता. नियमित रश्शी उडी मारल्याने तुमच्या हाता पायाची हाडे मजबूत होतील.आपल्या चेहऱ्यावर ग्लो येईल. गुडघ्यांच्या आजारापासून तुम्ही दूर राहू शकाल. तसेच मेमरी पॉवर वाढण्यासही मदत होईल. रोज १० ते १५ मिनिट रश्शी उडी खेळल्याने शरीरात २०० ते २५० कॅलरी बर्न होतात. उंची वाढण्यासही यामुळे मदत होते.
काही गोष्टी लक्षात ठेवा
रिकामी पोटी रश्शी उडी खेळू नका. अस केल्यास पोटात दुखू शकते. जेवायच्या २ तास आधी किंवा २ तास नंतर रश्शी उडी खेळा. रश्शी उडीच्या आधी ५ मिनिटं हलका व्यायाम नक्की करा.