`या` 8 सवयी बदलतील तुमचे आयुष्य, जाणुन घ्या...
आज आपण अशा 8 सवयींविषयी सांगणार आहोत ज्यांनी तुमचे आयुष्य (Life) बदलेल...
Daily habits : वाईट सवयींचा आपल्यावर लवकर प्रभाव दिसतो. पण चांगल्या सवयी अंगी बाणवण्यासाठी मात्र थोडा वेळ लागतो. असं न होऊ देण्यासाठी ज्या सवयी तुम्हाला बदलायच्या आहेत त्याची यादी तयार करा. संकल्प करा आणि मग त्या संकल्पाचे शिस्तीने पालन करा. कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही सलग 21 दिवस कराल तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीची सवय (Habits) लागलेली असेल. आपण नेहमीच प्रसिद्ध व्यक्तिंविषयी त्यांच्या नियमित सवयींविषयी लेखात किंवा पुस्तकांमध्ये वाचतो. आपल्याला ही यशापर्यंत पोहचायचे असेल तर आपल्या शरीराला आणि मनाला काही सवयी लावणे गरजेचे आहे. आज आपण अशा 8 सवयींविषयी सांगणार आहोत ज्यांनी तुमचे आयुष्य (Life) बदलेल... (Daily habits that change your life)
1. व्यायाम (Exercise)
दररोज व्यायाम केला पाहिजे हे आपल्याला शालेय आयुष्यापासूनच शिकवण्यात आले आहे. आपले शरीर सुदृढ आणि निरोगी असणे खुप गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला नियमित व्यायम करण्याची सवय असलीच पाहिजे. तुम्ही दररोज किमान 15-30 मिनिटे व्यायाम करणे अपेक्षित आहे. लहान, तरुण, प्रौढ, वृद्ध कोणत्याही वयाचे असाल तरी तुमच्या गरजेनुसार आणि तब्येतीनुसार व्यायाम करणे गरजेचे आहे. सकाळी चालायला जाणे, धावायला जाणे (Running), योग (Yoga), झुंबा (Zumba) किंवा मैदानी खेळ (Outdoor Games) अशा कोणत्याही प्रकारे व्यायामाची सवय तुम्ही शरीराला लावू शकता.
2. पुरेशी झोप (get enough sleep)
सध्या चालू असलेल्या धावपळीमुळे आपली बरीचशी कामे वेळेत होत नाही आणि त्यामागे प्रमुख कारण, आपली अपूर्ण झोप. "लवकर उठे लवकर निजे..." हा कानमंत्र आपण लहानपणी ऐकला आहे, पण तो आचरणात मात्र फार कमीच आणला जातो. तुम्हाला माहितीये का, सर्वात महत्त्वाची आणि चांगली सवय म्हणजे लवकर झोपणे आणि लवकर उठणे. मोबाईल, काम , अभ्यास या सगळ्यांमुळे आपली शरीराचे गणित (Biological Clock) बिघडले आहे. हे दुरुस्त करण्यासाठी झोपेच्या योग्य वेळा ठरवणे गरजेचे आहे.
3. ध्येय ठरवा (Goal)
आपले ध्येय जेव्हा निश्चित असते तेव्हा पावले उचलणे कठीण जात नाही. आपल्याला भविष्यात काय करायचे आहे याविषयी प्राथमिक अंदाज असल्यास आपण दररोज त्यासाठी प्रयत्न करत असतो. आपले ध्येय गाठण्यासाठी काय केले पाहिजे आणि काय नको याची यादी डोळ्यांसमोर असल्यास आपली दिशाभूल होत नाही. रिकाम्या वेळात स्वत:च्या ध्येयाविषयी विचार करा. जेणेकरुन ध्येय मिळवण्यास मदत होईल.
4. पुस्तके वाचा (Read books)
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात पुस्तके वाचणे थोडे कठीणच आहे. पण 'वाचाल तर वाचाल' या कानमंत्राला दुर्लक्षित करुन चालणार नाही. सकाळी फक्त दहा मिनिटे वाचनासाठी काढावीत. एखाद्या पुस्तकातील किमान 10 पाने वाचावीत. आपल्या विचारांवर सकारात्मक परिणाम जाणवतो.
आणखी वाचा ...आणि महिला Inners वापरू लागल्या; प्रत्येकानं वाचावी इतकी महत्त्वाची बातमी
5. दिनक्रम (To Do List)
दिवसाची सुरुवात होण्याआधीच दिनक्रम ठरवला पाहिजे त्यामुळे आपली कामे पूर्ण व्हायला मदत होते. आपल्याला कोणती कामे करायची आहेत, कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे आहे यासाठी दिनक्रम ठरलेला असेल तर त्याचा खूप फायदा होतो.
6. चिंतन/ध्यान (Meditation)
आपली शारीरिक धावपळ चालू असते तशीच मानसिक धावपळसुद्धा सुरु असते. सकाळी उठल्यावर काही क्षणासाठी चिंतन केल्यास दिवसभर आपल्यात सकारात्मक उर्जा राहते ज्यामुळे काम करताना तणाव जाणवत नाही.
7. आव्हान स्वीकारा (Challenge)
संधी कायम नवीन आव्हानातूनच मिळते. मी हे करु शकते/शकतो असा विश्वास स्वत:वर दाखवा आणि नवीन आव्हानांचा स्वीकार करा. यातून आपली क्षमता कळते. कामाच्या किंवा इतर ठिकाणी संकटं पेलण्याची आणि त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी करता येते. समोर आलेल्या आव्हानांचा कटांळा किंवा न घाबरता ती स्वीकारुन त्यातुन नवीन अनुभव घ्या.
8. कुटुंब आणि मित्रांना वेळ द्या (family and friends)
आपल्या कामांमुळे फारसा वेळ कुटुंब आणि मित्रमंडळींना देता येत नाही. त्यामुळे त्यांची नेहमीच तक्रार असते. पण हे विसरुन चालणार नाही की ते आपल्या आय़ुष्यातील महत्त्वाचे भाग आहेत. आठवड्यातील एक वेळ ठरवून तो कुटुंब आणि मित्रांसोबत घालवावा. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे निर्णय घेताना त्यांची मदत होते.
या 8 सवयी फारशा कठीण नाहीत, त्यामुळे त्यांच्याबद्दल विचार करायला काहीच हरकत नाही. कारण, आपल्या सवयीच मनावर ताबा मिळवून देतात आणि त्यामुळेच आयुष्य बदलायला मदत होते.
आणखी वाचा Office Tips : ऑफिसमध्ये काम करताना झोप येते, मग 'या' टिप्सची घ्या मदत