3 महिन्यांहून अधिक काळ एकच ब्रश वापरत असाल तर होऊ शकतात गंभीर परिणाम
टुथब्रश ही प्रत्येकाच्या डेली रूटीनमधील एक महत्त्वाची गोष्ट आहे.
मुंबई : टुथब्रश ही प्रत्येकाच्या डेली रूटीनमधील एक महत्त्वाची गोष्ट आहे. एका रिपोर्टनुसार टुथब्रश ही आपल्या घरातील सगळ्यात अस्वच्छ असणारी तिसरी गोष्ट आहे. त्यामुळे कळत नकळत तुमच्या आरोग्यावर ब्रशचा परिणाम होत असतो. अस्वच्छ ब्रशमुळे केवळ तोंडाचे किंवा दातांचे आरोग्य धोक्यात येते असे नव्हे तर यासोबतीने तुम्ही तुमच्या आरोग्याशी हेळसांड करत आहात. काही ठराविक महिन्यांनी तुम्ही ब्रश बदलणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे तुम्ही अस्वच्छ टुथब्रश वापरत असल्यास आरोग्यावर हे गंभीर परिणाम होऊ शकतात.
अस्वच्छ ब्रशमुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम -
1. अनेकजण ब्रश करण्यापूर्वी तो भिजवतात. या ब्रशवर पेस्ट लावल्यानंतर ती डायल्यूट होते. अशा ब्रशने दात घासल्याने त्याचा प्रभाव कमी होतो. यामुळे ब्रशही खराब होतो.
2. काहीजण वॉशरुममध्ये तर काही जण वॉश बेसिन जवळ टुथ ब्रश ठेवतात. अनेकदा वॉशरूममधील कीटाणू ब्रशवर जाऊ शकतात. हे डोळ्यांना दिसत नसले तरीही आरोग्याला त्रासदायक आहेत.
3. तुम्ही टुथब्रश ठेवत असलेला स्टॅन्डदेखील महिन्यातून एकदा स्वच्छ करणं आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा तुमचा टुथ ब्रश होल्डरही साफ करा. हे बॅक्टेरिया तोंडात, पोटात जाऊन आजार बळावू शकतो.
4. बाजारात ब्रशप्रमाणेच ब्रिसल सुरक्षित ठेवण्यासाठीही बॉक्स मिळतो. ब्रश सुरक्षित रहावा म्हणून तुम्हीही असा बॉक्स विकत घेत असाल तर ही चूक टाळा. कारण ओला ब्रश झाकून ठेवल्यास त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. म्हणूनच ब्रश वापरल्यानंतर तो उभा ठेवा. म्हणजे पाणी निथळून जाईल.
5.एका ब्रश होल्डरमध्ये सार्यांचे ब्रश दाटीवाटीने ठेवण्याची चूक करू नका. एकातून दुसर्यामध्ये सहज बॅक्टेरिया पसरू शकतात. जवळजवळ ब्रश ठेवल्याने दुसर्याचा ब्रश वापरल्याची चूकदेखील होऊ शकते.
6. अमेरिकन डेंटल असोसिएशनद्वारा देण्यात आलेल्या माहिनुसार, दर तीन महिन्यांनी टुथब्रश बदलणं अत्यावश्यक आहे. सतत किंवा झीजेपर्यंत एकच ब्रश वापरल्याने तोंडाचे आरोग्य बिगडू शकते. यामुळे दातांसोबत आरोग्यही बिघडू शकते.