मुंबई : हल्लीच्या काळातील बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याचे बिघडलेले वेळापत्रक याचा परिणाण थेट आरोग्यावर होतो. त्यामुळे हृद्यविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह सारख्या समस्या सतावतात. रक्तदाबाच्या समस्येवर गुणकारी उपाय म्हणजे खजूर. दररोज तीन खजूर खाल्यास रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. यात व्हिटॅमिन, मिनरल्स आणि प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- खजूरामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्यवर्धक मात्रा असतात. नियमित दोन ते चार खजूर खाल्ल्यास शरिराला ऊर्जा मिळते.


- वजन वाढत नसेल. तुमची देहएष्टी किरकोळ असेल, तर वजन वाढविण्यासाठी खजूर मदत करतो. खजुरात व्हिटॅमिन आणि प्रोटीन (प्रथिने) जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे वजन वाढण्यासाठी याची मदत होते. बारीक असणाऱ्या व्यक्तींनी रोज ४ ते ५ खजूर खाल्यास प्रकृतीत सुधारणा होते.


- खजूर खाण्यामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते. कारण खजूरामध्ये लोह, खनिज, कॉपर, सेलेनियम यांची अधिक मात्रा असते ज्यांमुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.


-फायबर्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठीही खजूर फायद्याचा ठरतो. तसेच कफ असेल तर तुम्हाला यातून सुटका मिळेल. चार खजूर रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर खा. आपल्याला काही दिवसात याचा फायदा लक्षात येईल.


- खजूर त्वचेसाठी खूप चांगले आहे. खजूर खाण्यामुळे चेहऱ्याला तेज येते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होतात. त्याचप्रमाणे त्वचा अधिक उजळ होण्यास मदत होते.