मुंबई : राज्याच्या पालघर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या विरार भागात कोरोनाची इतकी भिती दिसून आलीये की एका मुलीने कोरोना टेस्ट करण्यापूर्वी वयस्कर वडिलांचा मृतदेह तीन दिवस घरी ठेवला होता. इतकंच नाही तर यादरम्यान मुलीने सुसाईड नोट लिहून आत्महत्येचा प्रयत्न केला असता तिचे प्राण वाचवले आहेत.


कोरोनाच्या भितीने घरीच ठेवला मृतदेह


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलींच्या मनात भीती होती की वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचीही कोरोना टेस्ट केली जाईल. आणि जर कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली तर त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजू माने यांनी सांगितलं की, निवृत्त रेशन अधिकारी हरिदास सहारकर यांचा मृतदेह बुधवारी विरारच्या गोकुळ शहरातील त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आला.


सहारकर यांची धाकटी मुलगी स्वप्नाली हिने आदल्या दिवशी नवापूरमध्ये समुद्रात उडी मारली आणि स्थानिक लोकांनी त्याची सुटका केली तेव्हा ही बाब उघड झाली, असं अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले पुढे की, या प्रकरणाच्या तपासात असं दिसून आले की सहारकर यांचा रविवारी घरी मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबाने त्यांचा मृतदेह भीतीपोटी घरी ठेवला. 


राजू माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मोठी मुलगी विद्या हिने नवापूरमध्ये समुद्रात उडी मारून आत्महत्या केली आणि तिचा मृतदेह पोलिसांनी मंगळवारी बाहेर काढला. तर या व्यक्तीच्या लहान मुलीने अशाच प्रकारे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र तिचे प्राण वाचवण्यात आले.


अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, पोलीस सुरुवातीला आत्महत्या प्रकरणाचा तपास करत होते आणि आता अपघातामुळे मृत्यूचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. मृतांचे अंतिम संस्कारही करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास केला जातोय.