डेंगीच्या या `5` गोष्टींंबाबत वेळीच व्हा सावध !
पावसाळा आला की साथीचे अनेक आजारांचा धोकादेखील वाढतो.
मुंबई : पावसाळा आला की साथीचे अनेक आजारांचा धोकादेखील वाढतो. यामध्ये झपाट्याने पसरणारी एक भयंकर साथ म्हणजे डेंगी. डेंगीकडे वेळीच लक्ष न दिल्यास तो जीवघेणादेखील ठरू शकतो. डेंगीचा 'ताप' यंदा वाढण्याची शक्यता, व्हायरसचं नव रूप अधिक धोकादायक
डेंगीची लक्षणं -
डेंगीचं एक प्रमुख लक्षण म्हणजे अचानक वाढणारा ताप. डास चावल्यानंतर शरीरात झपाट्याने वाढणारा व्हायरसचा प्रभाव अल्पावधीमध्ये गंभीर होण्याची शक्यता असते. यामध्ये ताओ, डोकेदुखी, मळमळणे, उलट्या होणे, अंगदुखी, सांध्यांचे दुखणे, भूक मंदावणे अशी लक्षण आढळतात. रक्ताच्या चाचणीनंतर डेंगीचं निदान होईल परंतू डेंगीबाबत तुम्हांला काही गोष्टी ठाऊक आहेत का? नक्की वाचा : ताप नेमका डेंगी की चिकनगुनियाचा, हे कसं ओळखाल ...
रात्री दिव्याच्या प्रकाशातही डास चावण्याची शक्यता
डेंगीचे डास दिवसा चावतात हे तुम्हांला ठाऊक असेलच. मात्र रात्री दिव्याच्या प्रकाशातही या डासांचा धोका कायम असतो. सकाळी आणि सूर्यास्ताच्या वेळेस डेंगीचे डास अधिक गंभीर ठरू शकतात. डेंगीचे डास शरीरावर गुडघ्यावर, कोपर्यावर अधिक चावतात. 15-16 डिग्री पेक्षा कमी तापमानात डेंगीच्या डासांची पैदास होऊ शकत नाही. जुलै ते ऑक्टोबर महिन्यात या डासांची अधिक पैदास होते. या '5' कारणांंमुळे विशिष्ट लोकांंनाच डास अधिक प्रमाणात चावतात !
पांढर्या रक्तपेशींवर आक्रमण
डेंगीचे डास एकावेळेस सुमारे 100 अंडी देतात. त्यांचे जीवनमान सुमारे 2 आठवड्यांचे असते. डेंगीच्या डासांतून शरीरात गेलेला व्हायरस थेट पांढर्ता रक्त पेशींवर हल्ला करतात. यामुळे रोगप्रतिकारक्षमता कमी होते. एडिस मच्छरच्या केवळ एका हल्ल्यामध्येही रूग्ण गंभीर अवस्थेपर्यंत पोहचू शकतो.
घरातील टाक्या
दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाने प्रसारित केलेल्या एका रिपोर्टनुसार 41% डासांची पैदास प्लॅस्टिक ड्रम आणि कंटेनरमध्ये होते. सोबतच कूलरमध्ये डासांची पैदास होण्याचं प्रमाण 12% आहे. लोखंडाच्या कंटेनरमध्ये डासांची पैदास होण्याचं प्रमाण 17% आहे. डासांना पळवून लावतील हे घरगुती उपाय!
प्लेटलेट्स कमी झाल्यास डेंगीमुळे मृत्यू
डेंगीच्या रूग्णांमध्ये प्लेटलेट्स कमी होण्याचं प्रमाण अधिक असते. असे अनेकांना वाटते. परंतू कॅपिलरी लिकेजमुळे डेंगीच्या रूग्णांचा मृत्यू होतो. रूग्णांमध्ये कॅपलिरी लिकेज सुरू झाल्यानंतर त्यांना लिक्विड फूड दिले जाते. रूग्णांच्या उच्च आणि लो बीपीमधील अंतर 40 हून अधिक होत नाही तोपर्यंत काळजी घेणं गरजेचे असते.
संसर्गजन्य आजार
डेंगीची साथ असली तरीही तो संसर्गजन्य आजार नाही. एका व्यक्तीतून दुसर्याला त्याचा धोका नसतो. डेंगी व्हायरसच्या डासाने माणसाला चावल्यानंतर डेंगी पसरतो. डेंगी विविध स्वरूपाचा असला तरीही माणसाला एक वेळी एकाच प्रकारचा डेंगी होऊ शकतो. ज्या रूग्णांमध्ये 10,000 पेक्षा कमी प्लेटलेट्स असतात त्यांच्यामध्ये डेंगी जीवघेणा ठरतो.