Diabetes वाढल्याने त्रस्त आहात? आजच `या` फुलाची बी खा, डॉक्टरांकडे जाण्याची वेळच येणार नाही
Diabetes Control Tips: मधुमेह (Diabetes) हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. स्वस्थ जीवनशैली, योग्य आहार आणि नियमित व्यायामाद्वारे हा रोग नियंत्रणात ठेवता येतो. त्याचबरोबर एका फुलाचे बियाणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते.
Lotus Seed For Diabetes: सामान्यतः फुलांचा वापर हार, गजरे आणि सुशोभीकरणासाठी केला जातो. मात्र काही फुले ही खास खाण्यासाठीही पिकवली जाऊ शकतात. हे थोडेसे आपल्याला वेगळे वाटले तरी अगदी प्राचीन काळापासून वेगवेगळ्या प्रकारची फुले ही आहारामध्ये वापरली जातात. तर दुसरीकडे डायबिटीज (Diabetes) हा सर्वात जास्त होणार्या आजारांपैकी एक आहे. शुगर होणे जितके सामान्य आहे तितकेच ती नियंत्रित करणे कठीण आहे. शुगर नियंत्रित करण्यासाठी अनेक पद्धती अवलंबल्या जातात, त्यापैकी एक लिंबू आहे. लिंबूमध्ये असे अनेक घटक असतात (Lemon In Diabetes), जे मधुमेहामध्ये फायदेशीर असतात.
पूर्वीच्या काळी मधुमेह साधारणपणे 40-45 वर्षांनंतर होत होता. परंतु आजकाल लहान मुले, वृद्ध आणि तरुण सर्व वयोगटातील लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. जर एखाद्या व्यक्तीला हा आजार एकदा झाला तर तो त्याला आयुष्यभर सोडत नाही. कारण जगभरातील शास्त्रज्ञ आजपर्यंत यावर उपचार शोधू शकलेले नाहीत. भारतात मधुमेहाने ग्रस्त लोकांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे.
या फुलाचे बी फायदेशीर आहे
मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांना त्यांची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि नंतर किडनीचे आजार आणि हृदयविकाराचा झटका (heart attack) येण्याचा धोका वाढतो. यासाठी कमळाच्या फुलाचे बियाणे (Lotus seed benfits) मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याला कमल गट्टा (Kamal Gatta) असेही म्हणतात. ज्याच्या मदतीने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांना नेहमीच सकस आहार घेण्याचा सल्ला दिला जातो आणि कमळाचे बी हे पौष्टिक आहारापेक्षा कमी नाही.
वाचा: लग्नाआधी नक्की करा 'ही' मेडिकल टेस्ट, जोडीदारासमोर लाज वाटणार नाही!
तसेच कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. या फुलामध्ये मानवी शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता आहे. चविष्ट सॅलड डिशमध्ये कमळाच्या मुळाचे तुकडे वापरले जातात. फक्त मसालेदार मुळांच्या तुकड्यांना काश्मीरमध्ये नाद्रू म्हणतात. अन्य उत्तर भारतीय प्रदेशांमध्ये ते रोगन जोश आणि याखनी सारख्या प्रसिद्ध ग्रेव्हीजमध्ये (रस्सा) वापरले जाते. कमळ फुलाच्या बियांपासून लाह्या बनवतात, त्यांना फूलपताशा किंवा मखना म्हणतात. हर्बल चहामध्ये त्याचा वापर केल्यास रक्तस्राव आणि हृदयाशी संबंधित गुंतागुंत थांबवण्यास मदत होते. बिया मूत्रपिंडविकार, रागीटपणा आणि हृदयासाठी फायदेशीर आहेत. अस्वस्थता, धडधडणे आणि निद्रानाश बरे करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, पोटॅशिअम आणि प्रथिनांचे चांगले प्रमाण असल्यामुळे ‘जिम स्नॅक’ म्हणून वापरले जाते.
कमळाचे बीज महत्त्वाचे का?
कमळाच्या बियांमध्ये (Lotus seed benfits) पोषक तत्वांची कमतरता नसते. ते व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असते. जे मधुमेहावर खूप प्रभावी आहे आणि ग्लुकोजची पातळी नियंत्रित करू शकते. कमळाच्या फुलामध्ये बिया आढळतात जे नियमितपणे खाल्ल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो.
भारतीय संस्कृतीत कमळाचे फूल पवित्र मानले जाते आणि त्याचा उपयोग पूजेसाठी केला जातो. या फुलाच्या मुळापासून चविष्ट भाजीही तयार केली जाते. चिखलात वाढणारी ही फुले सजावटीसाठीही वापरली जातात. मधुमेहाच्या रुग्णांनी या फुलाच्या बियांचे जास्तीत जास्त सेवन करणे आवश्यक आहे. जर तुमच्या घराजवळ तलाव नसेल तर ते एका मोठ्या कुंडीतही एका खास पद्धतीने पिकवता येते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 TASS याची पुष्टी करत नाही.)