Relation Tips : लग्नाआधी नक्की करा 'ही' मेडिकल टेस्ट, जोडीदारासमोर लाज वाटणार नाही!

लग्नाअगोदर काही चाचण्या आहेत त्या करून घेतल्या पाहिजेत.

Updated: Nov 24, 2022, 03:34 AM IST
Relation Tips : लग्नाआधी नक्की करा 'ही' मेडिकल टेस्ट, जोडीदारासमोर लाज वाटणार नाही! title=

Medical Test before Marriage : आपल्याकडे संस्कृतीनुसार लग्न केलं जातं, विवाहाची परंपरा ही पवित्र मानली जाते. लग्नानंतर प्रत्येकाची इच्छा असते त्यांच्या पार्टनरनेही  त्यांना शारीरिक सुख द्यावं मात्र काहीवेळा काहीवेळा वैद्यकीय कारणांमुळे पुढे अडचणी येऊ शकतात. कारण काहींना अनुवांशिकही आजारही असू शकतात, त्यामुळे लग्नाअगोदर काही चाचण्या आहेत त्या करून घेतल्या पाहिजेत.

लग्नाआधी आपल्याकडचे लोक मुलाचे आणि मुलीच्या पत्रिका, शिक्षण किंवा पैसा पाहिला जातो. या सोबतच त्यांची वैद्यकीय चाचणी करायला हवी. Fertility टेस्ट केल्याने जोडप्यातील जोडप्यांना मूल होण्यासाठी अडचण येत नाही.

लग्नापूर्वी जोडप्याच्या मानसिक आरोग्याची स्थिती तपासली पाहिजे की त्याला काही मानसिक आजार आहे की नाही. वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येत नाही.

विवाहापूर्वी जोडप्याने थॅलेसेमियाची चाचणी करणे आवश्यक आहे. कारण यामुळे मुलांमध्ये जन्मजात दोष निर्माण होतात. त्यामुळे जोडप्यांनी लग्नापूर्वी त्याची चाचणी करून घेतली पाहिजे.

अनेकांना मधुमेह किंवा हृदयविकार खूप सामान्य झाले आहेत. त्यामुळे या जोडप्याला एकमेकांची कुटुंबातील अनुवांशिक इतिहास माहित असेल तर ते चांगलं आहे. जेणेकरून भविष्यात या आजारांवर उपचार करता येतील.

कोणत्याही व्यक्तीने लग्नापूर्वी एचआयव्ही आणि एसटीडी चाचणी करणे आवश्यक आहे. सुरक्षित सेक्ससाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही लग्नाची तयारी करत असाल तर नक्कीच सेरोलॉजी स्क्रीनिंग करून घ्या.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)