Nutrition by Age : अन्न, वस्त्र आणि निवारा या व्यक्तीच्या मूलभूत गरजा आहेत. यापैकी अन्न (Food), म्हणजेच भूक लागली की आपण लगेच काहीतरी खातो. मात्र अनेकदा भूक (Hunger) नसली तरीही आपण खातो. दरम्यान नुकत्यात झालेल्या एका संशोधनानुसार, एखाद्या पदार्थाचा सुवास (Food smell), आवाज तसंच त्याची जाहिरात (Food advertisment) या सगळ्या गोष्टी अति प्रमाणात खाण्यासाठी जबाबदार असतात. मात्र आपण काय काय खाल्लं पाहिजे? तसंच तुमच्या वयोमानानुसार, तुमचा आहार असावा हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की, आपली भूक निश्चित नसते. जसं आपलं वय वाढतं तसा भूकेतही फरक पडतो. 


20-30 वयोगटातील व्यक्तींसाठी आहार 


20 ते 30 वयोगटातील असणाऱ्या व्यक्तींना नोकरी, अभ्यास त्याचप्रमाणे लग्न या गोष्टींचा अधिक ताण असतो. अनेकदा या व्यक्ती या चांगल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. यामुळे शरीरात पोषक तत्वांची (nutrients) कमतरता जाणवते. त्यासाठी या वयातील लोकांनी त्यांच्या आहारात दही, दूध, शेंगदाणे यांचा समावेश करावा. त्याचप्रमाणे कॅल्शियम (calcium) , लोह आणि फोलेटचा समावेश करावा. 


30- 40 वयोगातील व्यक्तींचा आहार कसा असावा?


वयाच्या 30 ते 40 वयातील व्यक्तींनी त्यांच्या आहारावर अधिक लक्ष दिलं पाहिजे. या वयातील लोकांनी त्यांच्या आहारामध्ये बदाम, काजू आणि दूध, दही, पालक यांचा समावेश करावा. यावेळी कॅलरी (calories) आणि मॅग्नेशियम (magnesium) आहारात घेण्याचा विचार करावा. या वयामध्ये स्नायू कमी होतात ज्यामुळे चयापचय कमी होतो. मॅग्नेशियममुळे या वयातील लोकांना भरपूर ऊर्जा मिळण्यास मदत होते आणि रक्तदाब (Blood Pressure) आणि साखर नियंत्रित राहतो. 


40-50 वयोगातील व्यक्तींसाठीचा आहार


वयाच्या 40 ते 50 व्या वर्षात व्यक्तींनी त्यांची हाडं मजबूत असण्याकडे लक्ष द्यावं. अशा परिस्थितीमध्ये कॅल्शियम तसंच व्हिटॅमिन असलेल्या गोष्टींचं सेवन करावं. कॅल्शियमच्या सेवनाने या वयोगटातील व्यक्तींची सांधेदुखीची समस्या दूर होण्यास मदत होते.