मुंबई : चेहर्‍यावर पिंपल्स, ब्लॅकहेड्सचा त्रास जितका त्रासदायक असतो तितकेच डोळ्यांखाली येणारी डार्क सर्कल्स नकोशी वाटतात. ताणतणाव, अपुरी झोप यासोबतच आहारात पोषकतत्त्वांचा अभाव असल्यानेही डोळ्यांखाली डार्क सर्कल्स वाढतात.  आहाराचा आपल्या सौंदर्यावर सहाजिकच परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या आहारात कोणते पदार्थ आहेत याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे. डार्क सर्कल्सचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी पोषकघटकांचा समावेश करा. यामुळे त्वचेवर ग्लो येण्यासाठी मदत होते. 


 आहारात करा हे बदल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 आयर्नचा समावेश -
 
 आहारात पालेभाज्या, राजमा, चणे, बीन्स यांचा समावेश करा. आहारात अंड, मीट यांचा समावेश करा. शरीरात आयर्नची कमतरता होणं म्हणजे रक्त कमी असणं. त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ येण्याचा त्रास अधिक असतो. त्वचादेखील पिवळसर दिसते. 
 
 मुबलक पाणी प्या - 
 
त्वचेवर ग्लो वाढवण्यासाठी शरीरातील विषारी घटक बाहेर पडणं आवश्यक आहे. त्यामुळे मुबलक पाणी प्या. पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. सोबतच रक्ताभिसरणाची प्रक्रियादेखील सुधारते.  


कॅफिनयुक्त पदार्थांपासून दूर रहा - 


चहा, कॉफी अशा पदार्थांमध्ये कॅफिन घटक अधिक प्रमाणात असतात. अतिप्रमाणात कॅफिनचा आहारात समावेश करणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. त्याचा त्वचेवरही परिणाम होऊ शकतो. डार्क सर्कल्सचा त्रास टाळण्यासाठी कॅफिनयुक्त पदार्थ कमी खावेत.