मुंबई : मायग्रेन हा एक अत्यंत वेदनादायी त्रास आहे. अचानक मायाग्रेनचं दुखणं वाढत असल्याने त्याबाबत वेळीच काळजी घेणं आवश्यक आहे. अति तणाव, अपुरी झोप, लाईफस्टाईलमधील चूकीच्या सवयी यामुळे मायाग्रेनच दुखणं वाढतं. मायग्रेनच्या दुखण्यामध्ये डोकं केवळ अर्ध्या भागातच दुखते. मात्र हे दुखणे अनेकांना असहनशील असते. वेळी अवेळी हे दुखणं उद्भवू शकते त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणं गरजेचे आहे. 


मायग्रेनच्या त्रासापासून बचावण्यासाठी 'रिबोफ्लेविन' फायदेशीर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशोधनानुसार, रिबोफ्लेविन किंवा व्हिटामिन बी2  अशा पोषकघटकांनी युक्त पदार्थ मुबलक प्रमाणात खाणं फायदेशीर आहे. यामुळे मायग्रेनचा कमी करण्यास मदत होते. या पदार्थांमुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत होते. सोबतच सेल्सचे नुकसान होण्याचे प्रमाणही आटोक्यात राहते. महिलांच्या आहारात किमान 1.1 मिलीग्राम तर  पुरूषांच्या आहारात 1.2 मिलीग्राम रिबोफ्लेविन घटक असणं आवश्यक आहे. मायग्रेनचा त्रास केवळ डोक्यात नाही तर पोटातही वाढतो त्यामुळे हा त्रास तुम्हांला तर नाही ना? हे नक्की तपासून पहा.  


कशामधून मिळेल रिबोफ्लेविन घटक ? 


शाकाहारी पदार्थ - 


200 ग्राम दूध - 0.45 मिलीग्राम 


200 ग्राम दही - 0.57 मिलीग्राम   
100 ग्राम मशरूम - 0.23 मिलीग्राम   
100 ग्राम पालक - 0.21 मिलीग्राम   
एक औंस बदाम - 0.323 मिलीग्राम   
200 ग्राम सुकवलेले टॉमेटो - 0.285 मिलीग्राम    


मांसाहारी पदार्थ 


1 अंड - 0.228 मिलीग्राम  
3 औंस सॅलमन फिश - 0.135 मिलीग्राम 
3 औंस कलेजी - 2.9 मिलीग्राम