मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. दिलीप कुमार यांची तब्बेत गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होती. दरम्यान दिलीप कुमार यांना दीर्घकाळापासून बाइलेटरल प्लूरल इफ्यूजन ही समस्या होती. यासाठी त्यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज सकाळी 7.30 वाजता त्यांचं निधन झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाणून घेऊया दिलीप कुमार यांना सतावणारी बाइलेटरल प्लूरल इफ्यूजन समस्या काय आहे. 
बाइलेटरल प्लूरल इफ्यूजन ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये फुफ्फुसांच्या बाहेरील भागावर मोठ्या प्रमाणात द्रव तयार होतो. यामुळे, अनेक प्रकारचे रोग उद्भवू शकतात. जेव्हा रुग्ण या स्थितीत येतो तेव्हा हा द्रव त्याच्या फुफ्फुसांच्या बाहेर काढावा लागतो.


प्लूरा एक पातळ पडदा असतो. हे फुफ्फुसात आणि छातीच्या मध्ये असतं. परंतु जेव्हा ही समस्या उद्भवते, तेव्हा रिक्त जागेतच द्रव तयार होण्यास सुरवात होते. सामान्य परिस्थितीत एखाद्या व्यक्तीच्या प्लीहाच्या थरांमधील जागेमध्ये फक्त एक चमच्या इतकं द्रव असतं, जे श्वासोच्छवासाच्या दरम्यान फुफ्फुसांना हालचाल देण्यास मदत करतं.


प्लूयरल इंफ्यूजन होण्यामागील कारणं


अंतर्गत अवयवांमध्ये लीकेज


हे सहसा घडतं जेव्हा एखाद्याचं हृदय फेल होतं आणि हृदय पुरेसे रक्त पंप करण्यास अक्षम बनतं. याशिवाय या समस्येचे कारण किडनी आणि लिव्हर देखील असू शकते. असं तेव्हा होतं जेव्हा द्रव पदार्थ लीक होऊन प्लूयरलच्या जागी येतं.


फुफ्फुसांचा कॅन्सर


जे फुफ्फुसांच्या कॅन्सरने ग्रस्त आहेत त्यांना प्ल्यूरल इफ्यूजनची होण्याची समस्या होण्याती शक्यता असते. 


इन्फेक्शन


ज्या व्यक्तींना टीबी किंवा न्यूमोनिया यांसारखी गंभीर समस्या असते त्यांना प्ल्यूरल इफ्यूजनची तक्रार उद्भवू शकते.



प्लूयरल इंफ्यूजनची लक्षणं


या समस्येच्या सुरुवातीच्या काळात कोणत्याही प्रकारची लक्षणं दिसत नाहीत. मात्र ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची स्थिती अधिक खराब होते तेव्हा लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं खालीलप्रमाणे-


  • ताप

  • खोकला

  • श्वास घेताना त्रास होणं

  • श्वास घेताना छातीत दुखणं