मुंबई : भारतात सर्वाधिक लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होत नाही. अनेकांसाठी चहा हे अमृत असते. काहीजण दिवसातून कितीही वेळा चहा पिऊ शकतात. दिवसातून दोनवेळा चहा पिणे ठीक. मात्र काहीना दिवसातून चार ते पाचवेळाहून अधिक चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. अधिक चहा प्यायल्याने आरोग्याचे नुकसान होते.


अधिक चहा पिण्याचे हे आहेत तोटे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. दिवसभरात तीनहून अधिक वेळा चहा प्यायल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. 



२. अधिक चहा प्यायल्याने पचनक्रियेत अडथळा येतो.



३. चहाचे सेवन अधिक केल्यास दातांवर डाग येतात.



४. रात्री उशिरा चहा प्यायल्यास निद्रानाशचा त्रास संभवतो.



५. ज्यांना पोटात जळजळीचा त्रास होत असेल अशा व्यक्तींनी चहा पिऊ नये.